Friday, August 19, 2011

रसिकांची फसवणूक

 रसिकांची फसवणूक . . .

बालगंधर्व जबरदस्त चित्रपट कौशल च उत्तम संगीत मस्त कॅमेरा,अभिनय दिग्दर्शन,सेट....
बालगंधर्व यांचे कलेसाठी समर्पित जीवन .....मुलगी गेली असताना सदर केलेला प्रयोग रसिकांप्रती आत्मीयता पाहून डोळ्यात कधी पाणी आलं कळलच नाही आणि लगेच मनात विचार सुरु झाले अलीकडेच उघड होत असलेले कलाकारा बद्दल चे किस्से,सामाजिक भान न ठेवता केलेली कृत्ते आणि कलाकार असल्याबद्दल असलेला माज....हे सर्व बालगंधर्व चित्रपटातून बोध घेतील अशी अशा ... यानंतर यालाच विरुद्ध कृती आजच एक कार्यक्रम पहिला असे मागे बरेच गाण्याचे कर्यक्रम पाहण्यात आले त्यातील गायक लाइव शो करताना मागे सी डी वर गाणं लावायचे आणि रंगमंचावर नुसते गाण्याचा अभिनय करायचे (हल्ली बर्याच कार्यक्रमात असेच होते).रसिक पैसे देऊन कार्यक्रमाला येतात हे कितपत योग्य आहे ? (सी डी वर तर गाणे घरी देखील ऐकू शकतो),एखाद्या वेळी आवाज ठीक नसेल तर रसिक समजू शकतात पण आज सर्रास हा प्रकार पाहायला मिळतो.हि रसिकांची फसवणूक आहे अन्यथा कार्यक्रमच करू नयेत असे मी म्हणेन.

- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment