Friday, May 3, 2013

100 years of marathi cinema


मराठी चित्रपटांचा शतकमहोत्सव

                                                     राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंदराची फॅक्टरी

अत्यंत हलाकीची परिस्थिती पण दुर्दम्य इच्याशक्ती च्या जोरावर धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके या व्यक्तीने 3 मे 1913 साली निर्मिलेल्या  "राजा हरिश्चंद्र" या मूकपटाच्या प्रदर्शनानं भारतात चित्रपटांची गुढी उभारली गेली.त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली.मराठी चीत्रश्रुश्तीची "प्रभात" खर्या अर्थाने १ जून १९२९ रोजी झाली,चीत्रश्रुष्टीत इतिहास घडवणारी
"प्रभात" हि संस्था कोल्हापूर येथे स्थापन झाली. प्रभातने सुरवातीच्या दोन वर्षांत गोपालकृष्ण (१९२९), खुनी खंजीर (१९३०), राणीसाहेब ऊर्फ बजरबट्टू (१९३०), उदयकाल (१९३०), चंद्रसेना (१९३१), व जुलूम (१९३१) असे सहा मूकपट निर्माण केले.प्रभातने  अयोध्येचा राजा(१९३२) हा बोलपट बनवला या चित्रपटातून दुर्गा खोटे, गोविंदराव टेंबे,मास्टर विनायक,बाबूराव पेढारकर इं. दिग्गज कलावंत या
माध्यमातून समोर आले.
पाश्चात्य देशात बोलपटांची निर्मिती सुरू होऊन काही वर्ष उलटत नाहीत तोच  भारतात "आलम आरा" पहिला बोलपट निर्माण केला गेला जो १९३१ च्या मार्चमध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाची निर्मिती अर्देशीर एम्‌ इराणी यांची होती.यानंतर पहिला मराठी बोलपट "आयोध्येचा राजा" हा 1932 साली प्रदर्शित झाला.तो मराठी व हिंदी या दोन्ही भाषात एकदमच काढला गेला.एकाच वेळी मराठी व हिंदी अशा दोन
आवृत्त्या एकदम काढण्याच्या प्रथेमुळे हे चित्रपट भाषेच्या ओलांडून भारतभर पहिले गेले.भालजी पेंढारकर यांचा शाहू मोडक व शांता आपटे भूमिका असणारा श्यामसुंदर हा चित्रपट केला,या चित्रपटाने सर्वप्रथम रौप्यमहोत्सव (२५ आठवडे ) साजरा केला. १९३३ मध्ये व्ही. शांताराम यांनी रंगीत चित्रपट बनवण्यास सुरवात केली "सैरंध्री" हा त्यांनी बनवलेला चित्रपट,पण त्यांच्या प्रयत्न
दुर्दैवाने यशस्वी झाला नाही.
मराठी चित्रपट इतिहासात १९३६ ते ४२ या काळात सर्वाधिक चित्रपट निर्मिले गेले.बाबूराव पेंटर यांनी "सावकारी पाश" निर्मिला त्याच वेळी व्ही. शांताराम यांनी कुंकू चित्रपट काढला जो कि भारतभर लोकप्रिय ठरला,विशेष म्हणजे या चित्रपटात शांतारामांनी पार्श्वसंगीत न वापरता नैसर्गिक आवाज वापरले. त्यानंतर आले त्यांचे माणूस,शेजारी हे चित्रपट प्रचंड गाजले

या दरम्यान प्रभातने महाराष्ट्राच्या संतांच्या जीवनावर आधारित धर्मात्मा, तुकाराम आणि ज्ञानेश्वर हे तीन चित्रपटही याच काळात काढले.तुकाराम या चित्रपटाला व्हेनिस येथील चित्रप्टमहोत्सवात पारितोषिक मिळाले आणि तो मुंबईतील एका चित्रपटागृहात एक वर्ष चालला तर  या चित्रपटामद्धे दाखवण्यात आलेले ‘स्पेशल इफेक्टस्‌’ या तंत्रज्ञानाचा वापर (ज्ञानेश्वरांनी चालवलेली
भिंत,"शेजारी" मधील फुटलेले धरण) हे थक्क करणारे आहेत.
याच सुमारास भालजी पेंढारकरांनी नेताजी पालकर,स्वराज्य सीमेवर,राजा गोपीचंद यांसारखे ऐतिहासिक तसेच सुनबाई सारखे सामाजिक चित्रपट काढले.विनायकांनी लग्न पहावं करून, सरकारी पाहुणे आणि पहिली मंगळागौर हे विनोदप्रधान चित्रपट काढले.
दुसऱ्या महायुद्धामुळे आणि तेव्हा जारी केलेल्या फिल्म कपातीमुळे मराठी चित्रपटनिर्मिती जवळ जवळ संपूर्ण बंद पडली. १९४३ ते ४६ च्या दरम्यान फक्त दहा मराठी निघाले,त्यानंतर मेहबूब यांचा आन, सोहराब यांचा झांसी की रानी आणि व्ही. शांताराम यांचा झनक झनक पायल बाजे हे तीन पहिले भारतीय रंगीत चित्रपट.दुसर्‍या महायुद्धाचा शेवट आणि स्वतंत्र भारताचे लोकशाही राज्य या दोन्ही
घटनांमुळे मराठी चित्रपट क्षेत्रात नाविन्याचे वारे वाहू लागले.त्यानंतर व्ही. शांताराम  यांनी रामजोशी तर मंगल पिक्चर्सच्या जय मल्हार या चित्रपटात लोकप्रिय ग्रामीण करमणूक प्रकारांचा समावेश केला त्यामुळे सामान्य जनता देखील या चित्रपटांना गर्दी करू लागली.यात राजा परांजपे यांचा पेडगावचे शहाणे, दत्ता धर्माधिकारींचा बाळा जो जो रे, राजा ठाकुरांचा मी तुळस तुझ्या
अंगणी राम गबालेंचा जशास तसे, अनंत मानेंचा अबोली आणि माधव शिंदेंचा कांचनगंगा.ई. चित्रपट विशेष गाजले तर सुलोचना, वनमाला, उषाकिरण, चंद्रकांत, सूर्यकांत, हंसा वाडकर, राजा गोसावी, रमेश देव, सीमा , जयश्री गडकर, शकुंतला, अरुण सरनाईक असे दिग्गज अभिनेते यातून यशाच्या शिखरावर पोहोचले,तर ग.दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर, पु.ल. देशपांडे , दिनकर पाटील, ग, रा. कामत असे पटकथा लेखक तर
सुधीर फडके, वसंत पवार, वसंत देसाई आणि दत्ता डावजेकर अशी संगीतकार मंडळी यांच्या विशेष योगदानाने चित्रपट विशेष उंचीवर पोहोचले.पहिली संगीतकार जोडी "होनाजी बाळा" ची आठवण करुन देणारा "अमर भूपाळी" हा विशेष लोकप्रिय ठरला,याच दरम्यान आचार्य  अत्रे यांनी "श्यामची आई" हा ऐतिहासिक सिनेमा बनवला जो कि सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आणि या सिनेमाला राष्ट्रपती सुवर्ण पदकानं गौरव
करण्यात आल.दरम्यान जगाच्या पाठीवर,सुवासिनी ,उन-पाऊस,मानिनी,हा माझा मार्ग एकला,एक धागा सुखाच्या या सिनेमांचीही रसिकांनी विशेष दखल घेतली,त्याच वेळी चित्रपट माध्यमात काम करत असतानांच पु.लं. देशपांडे यांनी 'गुळाचा गणपती' या चित्रपटचं दिग्दर्शन केल या चित्रपटाला 'सबकुछ पु. ल.' म्हणून ओळखल जात.त्यांनी 'मोठी माणसे, मानाचं पान, देवबाप्पा, दूधभात' अश्या काही चित्रपटांना
संगीतसुद्धा दिले.
दरम्यान सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. राज्य सरकारने ताबडतोब नाटकांवरील करमणूक कर माफ करून तीन सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांसाठी पारितोषिके जाहीर केली.ग. दि. माडगूळकराचा "प्रपंच" या सिनेमाने हे पारितोषिक प्रथम मिळवल.त्यानंतर मराठी चित्रश्रुष्टीला जणू ग्रहण लागले,सशक्त मराठी रंगभूमी आणि रंगीत हिंदी सिनेमा यामुळे मराठी सिनेमाकडे हळूहळू प्रेक्षक
वर्ग पाठ फिरवू लागला.किंबहुना १९६० नंतरच्या दशकात मराठी चित्रपटांची निर्मिती घटत घटत वर्षास दहा बारा चित्रपटांवर येऊन ठेपली.त्यानंतर अनंत मानेच्या तमाशाप्रधान चित्रपटांस सर्वाधिक लोकप्रियता लाभली,दादा कोंडकेच्या "सोंगाड्य़ा" नं पुन्हा प्रेक्षकांना चित्रपट गृहा कडे खेचून आणलं आणि त्यांच्या चित्रपटांनी नवा इतिहास घडवला.या काळात "सांगत्ये ऐका" हा सिनेमा
जवळपास 138 आठवडे तिकीट खिडकीवर चालला या दशकात तमाशा प्रधान चित्रपट हे जास्त प्रमाणात निर्मिले गेले केला ईशारा जाता जाता,एक गाव बारा भानगडी.यामधूनच मराठीला निळू फुले सारखा दर्जेदार खलनायक मिळाला.या दशकातील इतर काही संस्मरणीय चित्रपट म्हणजे माधव शिंदेचा कन्यादान, राजा ठाकुरांचा रंगल्या रात्री अशा, वसंत जोगळेकरांचा शेवटचा मालुसरा आणि भालजी पेंढारकरांचा साधी
माणसे.यानंतर सत्तरच्या दशकात व्ही.  शांताराम यांनी मराठीतील अजरामर कलाकृती  "पिंजरा" ची निर्मिती केली हा चित्रपट सर्वच बाबींनी  परिपक्व असल्याने आजंही हा सिनेमा मराठीतला क्लासिक पीस म्हणून ओळखला जातो.
सन १९७५ साली विजय तेंडुलकरांनी लिहिलेला व पटेलांनी दिग्दर्शिलेला "सामना" बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिके मिळवून गेला.त्यांच्याच जैत रे जैत ला राज्य सरकारचे पारितोषिके मिळाले. त्यानंतरचा त्यांचा सिंहासन,उंबरठा,मुक्ता असे  कलात्मक चित्रपट डॉ. ज़ब्बार पटेल यांनी दिले.८० च्या दशकात २२ जून १८९७ (नचिकेत आणि जयू पटवर्धन),उंबरठा (डॉ.जब्बार पटेल.),शापित (अरविंद
देशपांडे -राजदत्त),स्मृतिचित्रे (विजया मेहता),महानंदा (K.G.कोरगावकर),पुढचे पाऊल,सर्जा,देवकीनंदन गोपाला(राजदत्त),कळत नकळत (कांचन नायक),आक्रित,बनगरवाडी(अमोल पालेकरा),सुशीला(अनंत माने),चोरीचा मामला(बाबासाहेब फत्तेलाल),असे लक्षात राहण्याजोगे सिनेमे तय्यार झाले.

या नंतर केवळ निखळ मनोरंजन या हेतूने सचिन पिळगावकर -अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने अफाट लोकप्रियता मिळवली.महेष कोठारेचे दे दणादण, झपाटलेला, थरथराट,धुमधडाका किंवा सचिनचे गंमत जंमत,माझा पती करोडपती,अशी ही बनवाबनवी,नवरी मिळे नवर्याला हे सगळेच चित्रपट मराठीमधले यशस्वी चित्रपट ठरले.दिग्दर्शक संजय सूरकर यांचे वेगळा विषय असलेला चौकट राजा विशेष
गाजला,त्यानंतर रावसाहेब,आपली माणसं,सुखान्त,तू तिथ मी,घराबाहेर,सातच्या आत घरात,हे त्यांचे गाजलेले चित्रपट,सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर यांनी दोघी,दहावी फ,वास्तुपुरुष,देवराई,हा भारत माझा असे वेगळा आशय असलेले चित्रपट निर्मिले.सन २ ००० नंतर  महेश मंजेराकारांचा अस्तित्व,मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,संदीप सावंत यांचा श्वास,गजेंद्र अहिरे यांचा नॉट  ओन्ली मिसेस
राउत,शेवरी तसेच बिपीन नाडकर्णी यांचा उत्तरायण,निशिकांत कामात चा डोंबिवली फास्ट,राजीव पाटील यांचा जोगवा,सचिन कुंडलकर यांचे रेस्टॉरंट,निरोप, परेश मोकाशी यांचा हरीश चंद्राची फॅक्टरी,उमेश कुलकर्णी यांचा देऊळ,विहीर,वळू,रवि जाधव यांचा नटरंग,बालगंधर्व,बालक पालक हे विशेष लक्षात राहण्यारे सिनेमे,ज्यामाद्धे श्वास,हरीश चंद्राची फॅक्टरी,होऊ दे जरासा उशीर या सिनेमांनि
ऑस्कर पर्यंत भरारी घेतली,
मधल्या काळात चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन असे समीकरण होऊन मराठी सिनेमांची भाराभार निर्मिती होत गेली ज्यामुळे मराठी चित्रपटांचा दर्जा खालावत गेला परिणामी मराठी रसिकांनी चित्रपटांकडे पाठ फिरवली,त्यानंतर अलीकडच्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमा काही चांगल्या विषयांच्या हाताळणीमुळे पुन्हा मराठी सिनेमाकडे प्रेषक वर्ग वळू पाहत आहे,आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय
पातळीवर मराठी चित्रपटांची प्रशंसा होत आहे.त्यातच मराठी मद्धे नवनवीन तंत्रज्ञान ज्यामद्धे ३ डी,व्ही एफ एक्स याचा वापर होत आहे.मराठी सिनेमाला चांगले दिवस येण्यासाठी चित्रपटाचा दर्जा टिकवणे महत्वाचे आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपट नवी भरारी घेयील अशी अशा बाळगायला हरकत नाही.

- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment