Wednesday, August 8, 2012

कोकण सहल . . .

कोकण सहल . . . 

बर्याच दिवसांनी पावसाने लावलेली हजेरी पाहून मोझे कॉलेज बालेवाडी (एम सी ए) च्या विद्यार्थांनी रायगड जिल्हय़ातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार या गावी सहलीला जायचा ठरवल.दिवस ठरला सार्वजन सकाळीच जायला निघालो.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं.ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.रस्त्यात नयनरम्य धबधबे मन आकर्षून घेतात.कोसळणाऱ्या पावसांच्या सरी,बेभाम वाहणारा वारा,आणि समोर धुक्यांनी दाटलेला रस्ता अश्या सर्व गोष्टीतून वाट काढत ताम्हणी घाटातून जाताना थोडीशी भीती आणि आतून थोडीशी मज्जा देखील वाटत होती.त्यानंतर कोकण सुरु झाले ठीक ठिकाणी नारळी-पोफळीच्या बागा व चारही दिशेला विभागलेले रस्ते असे सर्व अप्रतिम सौंदर्य.कोकणास ७५० कि.मी.चा समुद्र किनारा लाभलेला आहे. या टप्प्यात ध्येयभान विसरुन जावं, निसर्गाच्या विविध रुपांनी अचंबित व्हावे असे अनेक समुद्र किनारे पर्यटकांना खुणावत असतात. स्वच्छ, सुंदर आणि विस्तृत समुद्रकिनारे ही कोकणची खासियत आहे. वेंगुर्ला, निवती, दापोली-हर्णे, अलिबाग, किहीम, मुरुड,श्रीवर्धन, हरिहरेश्वर यासारखे एकापेक्षा एक सरस किनारे येथे पहावयास मिळतात. समोर अथांग अरबी समुद्र आणि मधोमध सोनेरी वाळूचे किनारे अशा विलोभनीय देखाव्यांमुळं एकदा रायगडला आलेल्या पर्यटकाला वारंवार कोकणात यावसं वाटतं.श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन, शेरवाडी, दिवेआगार, आदगाव, सवेर् असे सुंदर समुदकिनारे आहेत. याच सौंदर्यात हरवून गेलेल्या श्रीवर्धन गावाला इथं सापडलेल्या सुवर्ण गणेश प्रतिमेमुळे अचानक प्रसिद्धी मिळाली.या गावास पाच कि.मी. लांबीचा स्वच्छ सुंदर मनोहारी सागरकिनारा लाभला आहे. श्रीवर्धन तालुक्याच्या उत्तरेला दांडा राजपुरीची तर दक्षिण भागाला दासगाव -बाणकोट खाडी जोडून वाहते. या तालुक्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे. ऐतिहासिक दस्तावेज सांगतात की, दांडा राजपुरीच्या खाडीतून त्यावेळेस इथं असलेल्या मंदारपट्टण या बंदरातून परदेशी व्यापाराची रेलचेल होती, तर दक्षिणेकडे असलेल्या दासगाव-बाणकोट खाडीमध्ये पालीपट्टण बंदर होतं. याही बंदरातून परदेशी व्यापार होत असे. या बंदराजवळही सुरेख लेणी (गुंफा) आहेत, 






अगदी अलिकडे दिवेआगार प्रसिद्धीच्या झोतात आलं, ते इथल्या सुवर्ण गणेशामुळे. 17 नोव्हेंबर 1997 या दिवशी सकाळी दिवेआगारच्या सिद्धीविनायक मंदिराच्या पाठीमागील बाजूस द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळी-पोफळीच्या बागेत खोदकाम करत असताना एका तांब्याच्या पेटीत ही सुवर्ण गणेश मूर्ती त्यांना मिळाली.दिवेआगारमध्ये सुपारीबरोबर नारळ, केळी, ही पिकं घेतली जातात. या भागातील ‘रोठा’ ही सुपारीही सुप्रसिद्ध आहे. दिवेआगारच्या दक्षिणेस सुमारे 35 कि.मी.वर श्री क्षेत्र हरिहरेश्वर, तर दिवेआगारपासून दक्षिणेकडे 16 कि.मी. अंतरावर पेशव्यांचं मूळगाव श्रीवर्धन आहे व उत्तरेस सुमारे 20 कि.मी.वर ऐतिहासिक मुरुड-जंजिरा किल्ला आहे.डोंगर आणि समुद्र यांच्यामधून जाणारी वाट खर्‍या अर्थाने पर्यटनाचा आनंद मिळवून देत  भोवतालच्या निसर्गाचा आस्वाद घेत असताना  अंतर कधी कापलं जात हे देखील कळत नाही. मुरुड गावाप्रमाणे मुरुडचा समुद्रकिनाराही स्वच्छ व आनंद देणारा आहे. सुरुच्या बागा, किनार्‍यावरील टुमदार बंगले, ऐन डोंगरमाथ्यावर असलेला नवाबाचा राजवाडा, विविध पक्ष्यांचा चिवचिवाट, पर्यटकांची वर्दळ आणि नेहमीच सुरु असलेली कुठल्याना कुठल्या चित्रपटाची शुटींग यामुळं मुरुडचा किनारा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आला आहे. सोनेरी वाळू, वाळूवर सापडणारे विविध आकारांचे शिंपले, डॉल्फीन्स आणि कासवे हे मुरुडच्या किनार्‍याच वैशिष्ट्य आहे. मुरुडचा जंजिरा व कांसा हे दुर्ग तर मुरुडचे वैभव आहेत. किनार्‍यावरुन दोन्ही किल्ले स्पष्ट दिसतात.तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी खास बोटिंग ची व्यवस्था आहे.नावेतून प्रवास करताना समुद्राच्या लाटांशी झगडत आपण किल्ल्यावर पोहोचतो किल्ल्याहून चारही बाजूंना असणारा समुद्र मन आकर्षित करून घेतो.आणि मनात आश्चर्य हि निर्माण करतो समुद्रात हा किल्ला कसा बांधला असेल.शेवटी अशी सर्व नयनरम्य निसर्ग डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.अगदी सर्व कॉलेज च्या मित्रान बरोबर पाहिलेली हि सहल अविस्मरणीय अनुभवच होता.अशा या रमणीय आणि ऐतिहासिक ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment