Thursday, July 30, 2015

सिनेमाचे प्रकार

सिनेमा - हिंदी तसेच इतर भाषांचा विचार केल्यास जगात सर्वात जास्त चित्रपट भारतात बनतात,प्रतिवर्षी जवळपास १००० सिनेमे भारतात तयार होतात.सिनेमाचा विचार केल्यास त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे होते.
1.सामाजिक सिनेमा - सामाजिक विषयावर बेतलेला.
2.आर्ट फिल्म - कलात्मक चित्रपट (उदा. Lunch Box).
3.विनोदी सिनेमा.
4.तमाशा प्रधान सिनेमा.
5.ऐतिहासिक सिनेमा.
6.व्यक्तिनिष्ठ सीनेमा (व्यक्तीच्या जीवनावर आधारित).
7.भयपट.
8.एक्शन चित्रपट.
9.बालचित्रपट.
10.चौर्यकर्म सिनेमा (भारतातील अनेक सिनेमे बाहेरून चोरलेले सिनेमे असतात,जिस्म,मर्डर,अगदी मराठी मधला काय दया च बोला हा 'माय कझिन वीनी' वरुण घेतला होता झी taklis चा दे धक्का देखिल).
11.सायंस फिक्शन (उदा.रोबो).
12.धार्मिक चित्रपट.

 ~ श्रीनिवास कुलकर्णी ~

गरज दीर्घकालीन उपाययोजनेची . . . .


गरज दीर्घकालीन उपाययोजनेची  . . . . 

मराठवाडा म्हणलं कि दुष्काळ,बेरोजगारी,भारनियमन असे असंख्य प्रश्न डोळ्यासमोर येतात,अश्या अडचणींनी मराठवाडा कायम ग्रासलेला दिसतो,दरवर्षी जुन महिना आला कि पुन्हा पावसासाठी देवाचा धावा सुरु होतो,डोळे आकाशाकडे लागतात,पाऊस चांगला पडेल कि नाही या चिंतेने कायम मनात काहूर माजलेल असत,मराठवाड्यातील जनता आजही शेती या प्रमुख व्यवसायावर अवलंबून आहे,त्यामुळे दरवर्षी पडणार्या या प्रश्नांबाबत जागुरूक होऊन काही गोष्टींवर कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी,त्यादृष्टीने काही प्रमुख समस्या आणि त्यावर होऊ शकणारे उपाय यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न . . . 

# भारनियमन - 

सद्ध्या मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यात भारनियमन होते,यामुळे मोठ्या प्रमाणावर येथील उद्योग,शेती यावर परिणाम होतो,परळी येथील प्रकल्प सोडला तर बाकी स्त्रोत नाही,नुकतंच कामा निमित्त राजस्थान राज्यात जाण्याचा योग आला तेथील सौर उर्जा प्रकल्प पाहण्याचा योग आला,सौर उर्जेवर मोठ्या प्रमाणावर तेथे वीज निर्मिती होत असल्याने पंजाब,राजस्थान आणि आता गुजरात या राज्यांनी स्ववलंबनाकडे एक पाऊल उचलले आहे,अश्या चांगल्या गोष्टींचा आदर्श समोर घेणे सोडून राजकीय व्यक्ती महाराष्ट्र राज्य विकासात देशात सर्वांच्या पुढे असल्याच्या पोकळ गप्पा मारतात,.वाढत्या लोकसंखेमुळे मोठ्या शहरात जागेचा प्रश्न किवा कमी होत असलेल्या शेतीचा प्रश्न असला तरी उर्जा संवर्धन करण्यासाठी मराठवाड्यात असलेल्या माळरानांचा उपयोग केला जाऊ शकतो.

मध्यंतरी या विषयातील अभ्यासक भिडे सर यांचा लेख वाचण्यास मिळाला त्यांच्या अभ्यासानुसार "महाराष्ट्राचे केवळ १० टक्के क्षेत्र वापरले आणि सौर ऊजेर्चे रूपांतर विजेमध्ये केवळ तीन टक्के क्षमतेने केले तरीही दोन लक्ष मेगावॉट वीज निर्माण होऊ शकते. ही वीज राज्याच्या सध्याच्या गरजेच्या १० पट आहे.",तसेच आंतरराष्ट्रीय अभ्यासक टॉक याच्या म्हणण्यानुसार "जगाला लागणाऱ्या विजेपेक्षा 15000 पट अधिक विज सूर्यकिरणापासून मिळू शकते त्यासाठी गरज आहे लागणाऱ्या प्लेटची साईज आणि किंमत संशोधन करुन कमी करण्याची". 
त्यामुळे नैसर्गिक रीत्या उपलब्ध साधनांचा वापर करणे आता अत्यंत गरजचे आहे.मागे शहरामद्धे अनेक ठिकाणी पथदिवे तसेच वाहतुकीचे दिवे सौर उर्जेवर करण्यात येतील असे जाहीर करण्यात आले पण अजूनहि त्या योजनांची अंमल बजावणी होताना दिसत नाहीये.आता जास्तीत जास्त खर्चाचा भार सरकारने उचलून शहरी भागात देखील सौर उपकरणे अल्प दारात उपलब्ध करून द्यावीत.ज्यामुळे अत्यल्प दारात वीज निर्मिती होऊन विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होईल,एकंदरीत सौरऊर्जा तंत्रज्ञान अधिक अधिक विकसित करून विजेच्या बाबतीत स्वावलंबी होणे,त्याकडे गांभीर्याने ठोस पावले उचलणे अतिशय गरजेचे आहे.
राज्यातील काही गावं आता विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनत चालल्याचे चित्र दिसले.यासाठी तेथील ग्राम पंचायतींचे कौतुक करायला हवे.काही गावातील ग्राम पंचायतींनी त्या उपकरणांचा ९० % खर्चाचा भार स्वतः उचलला असून,कमीत कमी किमतीत हि उपकरणे उपलब्ध करून दिली जातात,त्यामुळे अनेक गावे आज विजेच्या बाबतीत स्वावलंबी झालेली दिसत आहेत.मराठवाड्यात निश्चितपणे याची अंमलबजावणी झाली तर भारनियमनातुन नक्कीच मुक्ती मिळू शकते,राजकीय नेतृत्वाने यात गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

  # दुष्काळभूमी मराठवाडा 

दुष्काळ आणि मराठवाडा हे एक समीकरणच बनून गेलय,अत्यल्प वृष्टी,मर्यादित साठवणीचे स्त्रोत,आणि आटत चाललेले भूजल साठे,आणि वाढत चाललेली पाण्याची मागणी यामुळे पाणी हि भीषण समस्या होऊ पाहते आहे,आणि यासाठी सरकारवर किती दिवस अवलंबून राहणार? यासाठी पडणाऱ्या पावसाचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे,राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशात मराठवाड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी सरासरी पाऊस पडतो; पण तरीही तेथील लोकांनी घराघरांत टाक्यांमधून पावसाचे पाणी साठविले आहे. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात दगदग करावी लागत नाही.सध्या नांदेडचा विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प वगळता मराठवाड्यातील सर्वच धरणं कोरडीठाण आहेत,नांदेडच्या विष्णुपुरी उपसाजलसिंचन प्रकल्पात अधिक पाणीसाठा पाणीसाठा असला तरी आंध्र प्रदेशच्या सीमेजवळ असल्यामुळे त्या धरणातील पाण्याचा उर्वरित मराठवाड्याला उपयोग नाही.पाणीटंचाईच्या बाबतीत दुसरी मोठी समस्या म्हणजे खोल खोल चाललेली भूगर्भातील पाणीपातळी. सध्या चारशे फुटांपर्यंतही बोअरला पाणी लागत नाही.ज्या बोअर्सना सध्या पाणी आहे त्या आणखी किती दिवस तग धरतील हा यक्षप्रश्न आहे,हळूहळू बोअर कोरड्या पडत जातील आणि ज्या धरणांत थोडाफार पाणीसाठा आहे तेही कोरडे पडत जातील तेव्हा पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच उग्र होईल. अर्थात सध्याही ती कमी उग्र नाही. सध्या खाजगी टँकर्सचा आधार लोकांना असला तरी त्याचा भाव अनेक ठिकाणी हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणासांचं बजेटच कोलमडून गेलेलं आहे. खेड्यापाड्यांत तर दोन दोन किमीवरून पाणी आणावं लागत आहे. तीव्र पाणीटंचाई आणि कामांची कमतरता यामुळे आतापासूनच थोड्याफार प्रमाणात स्थलांतर सुरू झालेलं आहे.

दुष्काळाचा फटका सर्वात आधी बसतो तो पशुपक्ष्यांना आणि गुराढोरांना. यंदाही तीव्र पाणीटंचाईमुळे रानावनात मोर, हरीण यांच्यासह सर्वच पशुपक्ष्यांना आणि खेड्यापाड्यांत गुराढोरांना पाणीटंचाईचा फटका बसू लागलेला आहे. राज्य सरकारच्या नियमांमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात अद्यापही मोठ्या संख्येने गुरांच्या छावण्या सुरू झालेल्या नाहीत. मराठवाड्यात स्थानिक संस्था आर्थिकदृष्ट्या फारशा सक्षम नसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात गुरांच्या छावण्या नगण्य आहेत आणि नगण्यच राहणार. आधीच जनता दुष्काळाने होरपळत असताना चार्याच्या छावण्यांसाठी  सरकारला लोकसहभाग महत्त्वाचा आणि अनिवार्य वाटतो,त्यासाठी प्रत्येकाने यासाठीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
*काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील तावरजा नदीजवळ जाण्याचा योग आला,आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून तेथे गाळ काढणे,नदीची पाणी साठवणुकीची पातळी वाढवणे असा स्तुत्य उपक्रम एप्रिल,मे या कालावधीत राबवला गेला,त्यासाठी अनेक कार्यकर्ते स्वतः श्रमदान करत होते भविष्यात त्याचा फायदा नक्कीच होईल, असे उपक्रम अधिक अधिक प्रमाणात राबवण्याची मराठवाड्याला गरज आहे.    

 *बंधारे बांधून : कोणतीही शेतजमीन सपाट नसते. तिच्यामध्ये थोडय़ा प्रमाणात का होईना चढउतार असतातच,यामुळे नाले तयार होतात. या नाल्यात दगड जमवून अडथळे निर्माण केल्यास पावसाचे पाणी थांबून राहते. लोखंडाची जाळी टाकून ते दगड पक्के राहू शकतात व त्यामुळे कायमस्वरूपी पाणी वाहण्याला प्रतिबंध केला जाऊ शकतो. हे पाणी जमिनीत मुरू दिल्यास भूजल पातळी वाढावयास निश्चितच मदत होते.

*पाणी साठवणुकीचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे शेततळे,कृत्रिम जलसाठे खणणे : पाऊस अनियमित झाला आहे म्हणून पाण्याचा संग्रह करणे गरजेचे आहे याचा उल्लेख सुरवातीसच आला आहे. तुमच्या भागात ७५० मिमी पाऊस पडत असेल तर एकरी तीन लाख लिटर पाणी जमावयास हवे. या पाण्याला वाहून जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी शेततळे हा नामी उपाय झाला. यासाठी सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता स्वत:च्या मदतीने हे काम करावयास काय हरकत आहे? नाही म्हटले तरी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या चार महिन्यांत शेतावर तुलनात्मकदृष्टय़ा कमी काम राहते. या वेळेचा सदुपयोग करून शेततळ्याचे काम करावयास काहीच हरकत नाही. याचा फायदा आपल्याला दीर्घ काळ होणार असेल तर हे काम झालेच पाहिजे. आज ऊठसूट सरकारवर अवलंबून राहण्याची सवय वाढत चालली आहे. याला पायबंद व्हावा. या शेततळ्यात जेव्हा पाणी जमेल त्या वेळी आपण केलेल्या श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटेल.पाणी संग्रही असल्यास वर्षांत दोन पिके काढण्यात कोणतीही अडचण यावयास नको.
वरील कामे आपण न केल्यामुळे दुष्काळाच्या झळा आपल्याला बसत आहेत. आपण स्वत: व आपली जनावरे आज संकटात आहेत. निदान आज तरी अशा प्रकारे पाणी अडवून भविष्य सुरक्षित करीन, असा संकल्प करावयास काय हरकत आहे?

# वर्षाजलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) - 

वर्षाजलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे छपरावर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळी लावून टाकीत साठवणे. हे पाणी अतिशय साध्या सोप्या तंत्राने शुद्ध करून वापरता येतं. या पद्धतीने अनेक ठिकाणी आज पाण्याची साठवणूक केली जाते. राजस्थानमध्ये तर ही परंपराच आहे. तिथे घरोघरी लहान आकाराच्या टाक्यांमध्ये छपरावरचे पाणी साठवून वापरले जाते. मोठमोठ्या हॉटेल्समध्येही ही पद्धत वापरतात. यातील टाकी बंधणे हा थोडासा खर्चिक भाग आहे. पाच माणसांच्या कुटुंबाला पावसाळा वगळता इतर आठ महिने पुरेल एवढे पिण्याचे आणि स्वयंपाकाचे पाणी साठवायला साधारण सहा ते आठ हजार लिटरची टाकी बांधावी लागते. मात्र हा खर्च एकदाच करावयाचा आहे. त्यामुळे दरवर्षी पाणी विकत घेण्याचा खर्च वाचेल. टँकरचाही खर्च काही प्रमाणात वाचेल. या टाक्यांच्या कामासाठी सरकारने सबसिडी देणेही उपयोगाचे ठरेल.

वर्षाजल संचयन करताना घ्यावयाची काळजी
*छपराच्या उताराचा आणि कुटुंबाच्या गरजेचा नीट अभ्यास करून टाकीचे आकारमान ठरवावे.
*पाऊस पडण्यापूर्वी छप्पर स्वच्छ करवे. किंवा सुरुवातीला एखादा तास पाऊस पडून गेल्यानंतर पाणी टाकीत सोडावे.
*टाकीत पाणी सोडण्यापूर्वी लहानशा फिल्टर टँकमध्ये अनुक्रमे विटांचे लहान तुकडे, कोळसा व वाळू यामधून जाईल अशी सोय केल्यास पाणी अधिक शुद्ध होते.
*टाकी सिमेंट किंवा आरसीसीमध्ये बांधावी. टाकी जमिनीखाली बांधल्यास जागेची बचत होते आणि पाणी सुरक्षित राहते. तसेच टाकी सर्व बाजूंनी बंदिस्त असावी.
*सिंटेक्स किंवा फायबरची टाकी वर्षाजल संचयनासाठी वापरू नये.
केव्हा करायचे हे वर्षाजल संचयन? सध्याची दुष्काळाची आपत्ती टळल्यानंतर? पाऊस पडून गेल्यानंतर? नाही, मराठवाड्याचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता, येणारा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वर्षाजलसंयनाची कामे करणं योग्य ठरेल. या वर्षीच पाण्यामुळे जी आणीबाणी निर्माण झाली आहे ती टाळण्यासाठी येत्या मॉन्सूनमध्ये जो पाऊस पडेल त्याचा एक थेंबही वाया घालविणे मराठवाड्याला परवडणारे नाही. म्हणून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यातच योग्य नियोजनद्वारे, योग्य तंत्र वापरून पावसाचे पाणी साठविण्यासाठी जास्तीत जास्त कामे करायला हवीत. अन्यथा पुढच्या काही वर्षातच मराठवाड्याचा वाळवंटी राजस्थान होईल.

# झाडी

पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी पाऊस अधिक का पडतो डोंगर-दर्या आहेतच पण प्रमुख कारण म्हणजे उपलब्ध वनराई,झाडी.आज राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा (०.०७ %) म्हणून मराठवाड्यातील लातूरचे नाव आघाडीवर आहे,याप्रमाणेच मराठवाड्यात देखील याबाबत उदासीनता कायम आहे,केवळ पावसाळा आला कि झाडे लावा झाडे जगवा या घोषणा ऐकायला मिळतात,केवळ वर्तमानपत्रात नाव यावे,व्यक्तीला,संस्थेला प्रसिद्धी मिळावी या हव्यासापोटी राजकीय पुढारी,संस्था एखादे झाड लावते,काही ठिकाणी तर असे पाहण्यात आले कि विशिष्ठ जागा दरवर्षी झाडे लावण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे,त्या ठिकाणीच दर वर्षी झाड लावण्यात येते,म्हणजे मागील वर्षी लावलेले झाड अपुर्या देखभाली अभावी न वाढल्याने जुने झाड काढून पुन्हा याच ठिकाणी वृक्षारोपण होते,आता या विसंगतीला काय म्हणावे ? खरोखरच समजत नाही.मराठवाड्यात अनेक रस्त्यात दुभाजक आहेत त्यात झाडे लावण्यासाठी काही जागा ठेवण्यात येते,या झाडांमुळे पर्यावरण समतोल तसेच उन्हाचा फटका कमी बसतो आणि सावलीने रस्त्याचे डांबर वितळण्याचे प्रमाण कमी होऊन रस्ता अधिक दिवस टिकण्यास मदत होते.परंतु मराठवाड्यात अनेक ठिकाणी दुभाजक उकिरडे म्हणून करण्यात येतो वापरण्यात येतो आणि पालिका देखील त्यावर कारवाई न करता दर आठवड्यात ती उकिरडे साफ करून या कृतीला प्रोस्थाहन देते हि खरोखरच अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,त्यामुळे पालिका पुढाकार घेत नसेल तर आपण पुढाकार घेऊन शाळा-महाविद्यालये यातील एन एस एस,एन सी सी चे विद्यार्थी,खरोखरच सामाजिक काम करणाऱ्या संस्था आणि सजग नागरिक यांनी पुढे येउन लोकसहभागातून वर्गणी गोळा करून रस्ता दुभाजक आणि उपलब्ध ठिकाणी झाडी लावल्यास बराच फायदा होऊ शकतो. 

# महात्वांकांक्षी नद्या जोडो प्रकल्प आणि मराठवाडा

मराठवाड्याचे वार्षिक सर्वसाधारण पर्जन्यमान ६७५ ते ९५० मिली मीटर असून या भागातून गोदावरी, पेनगंगा, पूर्णा, मांजरा, सिंदफणा, तेरणा,दुधना, कयाधु, मन्याड व लेंडी या प्रमुख नद्या वाहतात.जायकवाडी, पूर्णा व उर्ध्व पेनगंगा या प्रकल्पांच्या वर अन्य धरणे झाल्यामूळे मराठवाड्यातील ही धरणे आता अनेक वर्षे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत त्यामुळे नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचा अपवाद वगळता इतर ठिकाणी वृष्टीचे प्रमाण अतिशय कमी आहे,त्यामुळे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा नद्या जोडो प्रकल्प निश्चितपणे मराठवाडा,विदर्भ अश्या कमी पर्जन्यमान असणार्या ठिकाणी वरदान ठरणार आहे,राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवते,बरेचसे पाणी धरणे भरल्याने सोडून दिले जाते त्यामुळे नद्या जोडो प्रकल्प राबवला तर निश्चितपणे पुरामुळे होणारे नुकसान टळेल आणि दुष्काळग्रस्त भागाचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल.

मराठवाड्याच्या या काही प्रमुख समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या काही दीर्घकालीन उपाययोजनांची आज खरोखरच गरज आहे,लेखात दिलेल्या गोष्टींची जाण आपल्याला असेलच पण आपण वेळोवेळी याकडे दुर्लक्ष करत आलोय त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून त्याची अंमलबजावणी करण्याची हि योग्य वेळ आहे,यासाठी आपण स्वतः पुढे येउन स्वावलंबनाकडे पाऊल टाकायला हवे,हल्ली उपलब्ध फेसबुक,वोट्स अप यातून जनजागृती करून अधिक अधिक लोक यासाठी जोडता येतील.त्यामुळे मराठवाड्याचे हे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास नक्कीच मदत होईल.

- श्रीनिवास कुलकर्णी.
shrinivaskulkarni1388@gmail.com 

Monday, February 23, 2015

नाट्यशास्त्र

नाट्यशास्त्र


भरत मुनींनी नाट्य शास्त्राची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली असा समज आहे. नाट्य शास्त्राची निर्मिती इ.स.पू. ४०० ते इ.स.च्या २ ऱ्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे मानतात . भारतीय नाट्य आणि नृत्य शास्त्राची मूळ कल्पना या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात आहे. हे नाट्यशास्त्र दहा विभागात विभागले गेले आहे.ख्रिस्तपूर्व काळात भारतात भरत नावाचा मुनी होऊन गेला. त्याने नाट्यकलेवर एक ३७ अध्यायी ग्रंथ लिहिला. तोच ग्रंथ भरताचे नाट्यशास्त्र म्हणुन प्रसिद्ध आहे.अशी आख्यायिका आहे की देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांस कळतील असे वेद निर्माण करण्यास सांगितले. त्यावर, त्याने 'नाट्यवेद' म्हणुन पांचवा वेद निर्माण केला.यात, ऋग्वेदातील पाठ्य,यजुर्वेदातील अभिनय,सामवेदातीलगायन आणि अथर्ववेदातील रस घेण्यात आलेत. नाट्यवेदाच्या निर्मितीनंतर,त्यांनी भरतमुनींना त्याचा पृथ्विवर प्रसार करण्यास सांगीतले.शिवाने भरतमुनीचे प्रथम नाट्य बघुन,आपला शिष्य तंडु यास भरत मुनीस नृत्याचे अधिकृत सिद्धांत कथन करण्यास पाठविले.या सिद्धांतांचा समावेश त्याने ’तांडव लक्षण’ या सदरात केला आहे.भरत मुनींनी शरीराच्या १० मुद्रांचा, मानेच्या ९,हातांच्या ३६ तर डोक्याच्या १३ मुद्रांचा त्यात समावेश केला आहे. नृत्यातील वेगवेगळ्या शाखांनी मग त्याचे या मुळ सिद्धांतांचा वापर करून व त्यास फुलवुन, त्यांची, कंठ व वाद्य संगीताशी एकतानता करुन, त्याचा एखाद्या कथेच्या/कथानकाच्या सादरीकरणासाठी विस्तृतपणे वापर केला. भरत नाट्य ,कथकली ,कुचुपुडी  व लावणी या सगळ्यात नाट्यशास्त्र असते. काबुकी या मध्ये देखील नाट्यशास्त्र असते.


नाटक - नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणार्‍या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती.

अभिनय कलेचा उगम - माणूस जन्माला येतो तो एक अभिजात नट म्हणून,लहान असताना तो रडण्याचा अभिनय करतो,त्याच्या डोळ्यात पाण्याचा थेंब देखिल नसतो तरी त्याला माहित असते रडण्याचा आवाज काढला की त्याला हवी ती गोष्ट मिळणार.
लहानपणी आपण घरसंसार हा खेळ खेळलेला असेल बहुली,स्वयंपाकघर आणि तेथे नसलेल्या गोष्टि देखिल आपण असल्याचा भास निर्माण करतो म्हणजेच आपन अभिनय करतो.

भरताचे हे नाट्य शास्त्र चार वेदांच्या थोड्या फार माहितीने बनले आहे आणि यासाठी विविध माहितीचा उपयोग केला गेला आहे यामध्ये २२ वा अध्याय हा सामान्य अभिनयाचा आहे आंगिक वाचिक सात्विक अभिनयाचे संतुलन म्हणजे सामान्य संतुलन होय भूमिकेशी समरस होणे म्हणजे सात्विक अभिनय होय जो यात अत्यंत महत्वाचा आहे

अभिनयाचे चार प्रमुख प्रकार सांगितले आहेत -

a.आंगिक
b.वाचिक
c.सात्विक
d.आहार्य

’अभिनय’’ च्या  अंतर्गत गायन,वादन,नर्तन,मंच शिल्प,काव्य,आध्यात्म,दर्शन,योग,मनोविज्ञान,प्रकृति या सगळ्यांचा समावेश असणे गरजेचे आहे आणि तरच अभिनयाद्वारे इच्छित परिणाम साधला जातो वाचिक अभिनयाचे दोन प्रकार आढळतात
लोक्धार्मी
नाट्य धर्मी
याव्दारे अभिनयाचा कस लागतो लोक्धार्मी यात वास्तववादी भूमिका करावयाची असते कि ज्या मुळे भूमिका ही जिवंत वाटली पाहिजे आणि नाट्य धर्मी मध्ये नाटकाद्वारे अभिनय साधावयाचा असतो
---------------------------------------------------------------
अभिनय म्हणजे एखाद्या व्यक्तीचा झालेला कायाप्रवेश (अभिनय करताना अपन एखादी व्यक्तिरेखा सकरतो म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या मद्धे आणतो) - दिलीप प्रभावळकर.

कलाकार हा दुप्पट आयुष्य जगतो एक स्वताचे आणि दुसरे तो ज्या व्यक्तिरेखा सकरतो त्यांचे.
---------------------------------------------------------------

अभिनय -

’अभिनय’’ च्या  अंतर्गत गायन,वादन,नर्तन,मंच शिल्प,काव्य,आध्यात्म,दर्शन,योग,मनोविज्ञान,प्रकृति या सगळ्यांचा समावेश असणे गरजेचे आहे आणि तरच अभिनयाद्वारे इच्छित परिणाम साधला जातो वाचिक अभिनयाचे दोन प्रकार आढळतात
लोक्धार्मी
नाट्य धर्मी
याव्दारे अभिनयाचा कस लागतो लोक्धार्मी यात वास्तववादी भूमिका करावयाची असते कि ज्या मुळे भूमिका ही जिवंत वाटली पाहिजे आणि नाट्य धर्मी मध्ये नाटकाद्वारे अभिनय साधावयाचा असतो.


आंगिक अभिनय - 
आंगिक अभिनय म्हणजेच शारीरिक हालचाली, चेहरा आणि हावभाव या माध्यमातून भावना रसिकांपर्यंत पोहोचवणे.

सात्विक अभिनय -
सात्विक अभिनय म्हणजे ज्यमद्धे स्वेद, स्तंभ, कंप, अश्रु, वैवर्ण्य, रोमांच, स्वरभंग आणि प्रलय याची गणना होते.

वाचिक अभिनय - 
वाचा म्हणजे वाणी,बोलणे.शब्दोचारातुन भावना व्यक्त करने म्हणजे वाचिक अभिनय.
नाट्यवाचन,कथाकथन,आकाशवाणीवरून होणारी नाट्य ही वाचिक अभिनयाची उदाहरने आहेत.
शब्दाच्या नुसत्या उच्चारावरून पत्राची ओळख झाली पाहिजे,त्यावरून त्याचे वय,व्यवसाय व मानसिक अवस्था प्रगट व्हावी.
नाट्य संस्करामद्धे वाचिक अभिनयाच्या दृष्टीने दोन महत्वाच्या गोष्टी आहेत.
    * आपन श्वास घेतो त्यावेळी हवा श्वासावाटे आत घेणे ती शरीरात साठवणे,त्यासाठी दिर्घ श्वास घेउन हळू हळू तो          सोडणे.
    * ओंकार यामद्धे ॐ हा शब्द उच्चारायचा जितका जास्त वेळ ओंकार टिकत असेल तितका चांगला.
      यामुळे स्वर लांम्बवने,आवाजात चढ़ उतार करने सुलभ जाते.

जिभेचे व्यायाम - # जीभ जास्तीत जास्त बाहेर काढून नाकाच्या शेंडयाला लावण्याचा प्रयत्न करने.
                        # जीभ चक्राकार फिरवने.
                       # जीभ ओठांवरन फिरवने
                      # ल,ळ असलेले शब्द भरभर पण स्पष्टपणे म्हणणे.

आहार्य अभिनय
आहार्य अभिनय हे वास्तविक पाहायला गेले तर अभिनयाचे अंग नसून रंगभूषा आणि वेशभूषा यामधून प्रगट होते. उदा. - शंकराचा गेटअप.

- श्रीनिवास कुलकर्णी 

अभिनयातले ९ रस





अभिनयातले ९ रस 

प्रथम - श्रृंगार रस - या मुद्रेतून प्रेम आणि सौंदर्य प्रगट होते.

द्वितीय - हास्य रस -  ज्या रसातून हास्य प्रगट होते तो हास्य रस.

तृतीय - रौद्र रस - रौद्र रसातून राग प्रगट केला जातो,भगवान शंकर यांचे तांडव नृत्य आपण पहिले असेल तर रौद्र रूप आपल्याला दिसते.

चतुर्थ -  करुण रस - एखादी घटना पहिली कि आपले मन उदास होते त्या घटनेबद्दल आपल्याला सहानभूती वाटू लागते.उदा.- एखादी व्यक्ती मृत झाली किवा रस्त्यावरचा भिकारी पाहून आपल्या मनात हे भाव निर्माण होतात.

पंचम - वीभत्स रस - हा रस घृणा प्रगट करतो,आपण एखादी अशी गोष्ट पहिली ज्यातून आपल्याला घृणा निर्माण होते.

षष्ठ - भयानक रस - या रसातून भय,भीती व्यक्ती होते,हे दाखवण्यासाठी आपण काळ्या रंगाचा वापर करतो.

सप्तम - वीर रस - याचा सरळ संमंध युद्ध, शौर्य , उत्साह या गोष्टींशी आहे,या रसातून वीरता प्रगट होते.

अष्टम - अद्भुत रस - या रसातून आश्चर्य प्रगट होते,डोळ्यांना न पटणारी विश्वास न बसणारी गोष्ट समोर दिसली कि हे भाव प्रगट होतात.

नवम - शांत रस - या रसातून शांतता प्रगट होते.या रंगास निळ्या रंगाने प्रदर्शित केले जाते.




- श्रीनिवास कुलकर्णी 

Friday, March 14, 2014

भावना दुखावून धेणे : एक व्यवसाय . . .



भावना दुखावून धेणे : एक व्यवसाय  . . . 

हल्ली भावना दुखावणे हा एक प्रकार आपल्या भारतीय समाजात रुढ होत चालला आहे,रोज वर्तमानपत्र उघडलं कि कोणाच्यातरी भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे अमुक गोष्टीवर बंदी वैगेरे. गोष्टी हमखास वाचावयास मिळतात,भारतीय समाजातील व्यक्तींच्या भावना वरचेवर अधिक अधिक नाजूक आणि हळव्या होत चालल्या आहेत,परवाच दिल्लीतील एका संस्थेच्या सदस्यांचा गणवेश "गुलाबी" होता आणि "गुलाबी ग्यांग" या चित्रपटाच्या नावामुळे त्या संस्थेच्या सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या,वृत्तपत्रांनी त्याला अमाप प्रसिद्धी दिली पण चित्रपट मात्र ठराविक वेळी प्रसिद्ध झाला,त्यामुळे हा केवळ प्रसिद्धीसाठी अवलंबलेला मार्ग होता कि आणखी काही हा विचार सोडला तरी ती संस्था आणि चित्रपट या दोघांना हि प्रचंड प्रसिद्धी मिळाली,त्यामुळे काही अपवाद सोडले तर भावना दुखावणे या नावाखाली एक प्रकारचा व्यवसाय समाजात रूढ होऊ पाहतो आहे.  

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावना दुखावून घायला हव्यात.एखाद्या समाजावर वादग्रस्त वक्तव्य करणे,अश्लील वक्तव्य करणे,हिंदू देवतांचा अपमान करणं अश्या गोष्टी 'जाणीवपूर्वक' करायच्या आणि अमाप प्रसिद्धी मिळवायची,पूनम पांडे,राखी सावंत तसेच दारू पिउन तुरंगाची हवा खाणारा एका राजकीय पुढार्याचा मुलगा आज विनोदाच्या कारेक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो हि आणि अशी इतर बरीच उदाहरणे देत येतील ज्यांनी झोतात येण्यासाठी लोकांच्या भावनांचा वापर केला. 

परवाच एका उपहारगृहात मित्राची वाट पाहत बसलो असताना बाजूच्या टेबल वर सुरु असलेला व्यक्तींमधला संवाद ऐकून डोकं चक्रावल,एक चित्रपट निर्माता समोर बसलेल्या एका समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करीत होता,चर्चेचा सारांश असा कि "त्यातील एक व्यक्ती (चित्रपट निर्माता) विशिष्ठ एका समाजावर चित्रपट बनवत होता आणि तो पूर्ण होताच प्रदर्शन पूर्वी त्या सामाजिक नेत्याने पत्रकार बंधूंना बोलावून चित्रपटातून भावना दुखावल्याचे सांगून निदर्शनं करावीत,दोन दिवसांनंतर त्या समाजातील प्रमुख लोकांना चित्रपट दाखवून त्यात आक्षेपार्ह नसल्याचे सांगून चित्रपट प्रदर्शनाला परवानगी देण्यात यावी,दरम्यानच्या दोन दिवसात तुमची संस्था आणि आमचा चित्रपट दोघेही चर्चेत येऊ ? ? ? ". 

यावरून भावना दुखावल्याच्या नावाखाली ज्या झुंडशाहीचे प्रदर्शन होतांना दिसते त्याला नियंत्रणात आणण्याची नितांत गरज आहे,अन्यथा मुळातच भावनाशुन्य होत चाललेल्या भारतीय समाजाचा भावनांवरचा विश्वासच उडेल.अनेकवेळा हे जाणीवपूर्वक केल जात नसलं तरीदेखील एखादा कर्तुत्वान व्यक्ती अश्या कृत्या मुळे काही काळ का होयीना हवालदिल होतो.व्यक्तीला व्यक्त होण्याचा अधिकार घटनेनेच दिला असला तरी इतरांना दुखावण्याचा,अपप्रचार, अश्लीलता तसेच कोणतेही समाजविघातक कृत्य करण्याचा अधिकार दिलेला नाही आणि याला विरोध करायचाच असेल तर न्यायालयात जाऊन शांततापूर्वक पद्धतीने,इतरांना विश्वासात घेऊन देखील करतो येतो,असे असतांनाही अनेक जण रस्त्यावर उतरतात,जाळपोळ,दगडफ़ेक करतात,या सर्वांवर आवर घालू शकणारे सरकार बहुदा मतपेटीवर डोळा ठेऊन गप्प बसते,त्यामुळे अश्या परीस्थित सामान्य माणसाचे मात्र हाल होतात.त्यामुळे असे प्रकार घडताना त्याला कितपत महत्व द्यायचे ते प्रसिद्धी माध्यमांनी देखील ठरवायला हवे.


- श्रीनिवास कुलकर्णी.

मुलाखत - मुकेश खन्ना.


मुलाखत अभिनेते - मुकेश खन्ना. 



मुकेशजी "शक्तिमान" ची निर्मिती कशी झाली ?  

- मुळात शक्तिमान अगोदर मी महाभारत या मालिकेमद्धे भीष्म पितामह यांची भूमिका वठवली होती,त्यानंतर मला मोठी दाडी वैगेरे असणार्या भूमिका मिळू लागल्या,त्यामुळे मी त्या भूमिकेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होतो.आणि मी पाहायचो कि आपल्याकडील लहान लहान मुले स्पायडर म्यान,ब्याट म्यान अश्या विदेशात तय्यार होणार्या मालिका पहायचे,त्यामुळे भारताचा सुपरहिरो असावा या विचाराने शक्तिमान ची निर्मिती केली. 

"शक्तिमान" चे अनुकरण अनेक लहान मुले करायची,अजूनही करतात यमुळे काही दुर्घटना देखील मागे घडल्या त्याबद्दल . . .  ?

- हो मुळात लहान मुले हि एखाद्या गोष्टीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात,अगदी मी कोठे कारेक्रमाला गेलो असता मला "शक्तिमान सारखे उडून दाखवा गोल गोल गिरकी घेऊन दाखवा" वैगेरे विनंती मला लहान मुलां कडून यायच्या,पण त्यावेळी हे सर्व संगणकाच्या साह्याने केलेल्या करामती आहेत असे समजावून सांगताना मला प्रचंड कसरत करावी लागे,त्यामुळे "छोटी छोटी मगर मोटी बाते" याचा समावेश शक्तिमान या मालिकेमद्धे केला,यातून त्यांच्या मद्धे समाजाप्रती जागरूकता निर्माण ह्वावी हा उद्देश होता. 

सामान्य माणसांनी "शक्तिमान" बनण्यासाठी काय करावे असे आपल्याला वाटते ?

- प्रत्येक जण "शक्तिमान" बनू शकतो,निसर्गतः जी बुद्धी आपल्याला मिळाली आहे त्याचा आपण १० % वापर देखील करत नाही,अगदी ९९.९ % लोक आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत,त्यांनी बुद्धीचा वापर करायला शिकले पाहिजे,शक्तिमान मद्धे शरीरातील चक्र जागवण्याची एक क्रिया दाखवली जायची व्यक्तीच्या शरीरात एकूण सात चक्र असतात.सहस्त्रार चक्र,आज्ञा चक्र,विशुध्द चक्र,अनाहत चक्र,मणिपुर चक्र,स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र हे योग अभ्यासाद्वारे आपण कार्यान्वित करू शकतो,याचा प्रचंड फायदा आपल्याला जीवनात होतो,सोबतच माणुसकी आणि एकमेकांप्रती सहकार्यभाव आपण जपला पाहिजे.    

मुकेशजी आपण आपल्या अभिनय कारकिर्दीत नकारात्मक भूमिका केली नाही ?

- हो,कारण मला नेहमी सत्याची बाजूने लढायला आवडते,आणि हेच कारण असेल कि मी नकारात्मक भूमिकेचा विचार देखील कधी केला नाही. 

मुकेशजी हल्लीच्या मालिकांन बद्दल काय वाटते ?

-  प्रामाणिकपणा,विश्वास,सहकार्याची भावना या गोष्टी समाजातून नष्ट होत चालल्या आहेत,चित्रपट आणि मालिका याचा प्रचंड प्रभाव समाजावर पडतो,अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जातात,यामद्धे सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.

देशातील पहिला सुपरहिरो "शक्तिमान" याबद्दल काही आगामी योजना आहेत का ?

- हा हा हा,मी जायील तिथे मला हा प्रश्न विचारला जातो,या मालिकेबद्दल आजही असणारे लोकांचे प्रेम पाहून आनंद होतो आणि होय तुम्ही म्हणल्याप्रमाणे देशाचा पहिला सुपरहिरो "क्रिश" अथवा "रावण" नसून तो "शक्तिमान" आहे,शक्तिमान हि मालिका पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यावर काम सुरु आहे,आणि त्यावर चित्रपट बनवा अश्या देखील कल्पना समोर आल्या पण हल्ली त्या विचाराधीन आहेत.

अभिनेते मुकेश खन्ना हल्ली कमी पाहायला मिळतात,त्याचे कारण ?

- तसे काही नाही पण हो मी सद्ध्या लहान मुलांना मार्गदर्शक ठरेल,त्यांना सामाजिक बांधिलकीची जाण होयील या अनुषंगाने एक पुस्तक लिहित आहे,लवकरच त्याचे काम पूर्ण होयील.

युवकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता ?

- (मिश्कील्तेने भीष्म पितामह यांच्या आवाजात) आयुषमान भव,सदा विजयी भाव . . . 



मुकेशजी आपल्या पुढील उपक्रमास शुभेछ्या !
धन्यवाद !

- श्रीनिवास कुलकर्णी 

Saturday, December 21, 2013

मुलाखत इशा कोप्पिकर



मुलाखत इशा कोप्पिकर



खल्लस गर्ल इशा कोप्पिकर मुंबईच्या माहीम परिसरात वाढलेली मराठी कोकणी मुलगी अठरा-वीस वर्षापूर्वी मॉडेलिंगमध्ये आली आणि तिथून थेट दाक्षिणात्य चित्रपटांत चमकली. त्यानंतर हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांत काम करत करत ती आता मराठी चित्रपटात पदार्पण करतेय.याविषयी तिच्याशी केलेली खास बातचीत…

# ईशा तुझ्या अभिनय प्रवासाविषयी सांग ?

मी मुंबईच्या रामानंद रुईया महाविद्यालयातून पदवीधर झाले,त्यानंतर सुप्रसिद्ध फोटोग्राफेर गौतम राजाधक्ष्य यांच्याकडून मी फोटो काढून घेतले,त्यानंतर मिस इंडिया मद्धे भाग घेतला त्यात मला मिस टैलेट म्हणून गौरवण्यात आले,त्यानंतर मला तमिळ मद्धे तेव्हा मला एका दक्षिण भारतीय दिग्दर्शकाकडून एका ‘काधल कविथाई’ या तमिळ चित्रपटाची ऑफर आली होती. त्यात माझ्याबरोबर अरविंद स्वामी होता आणि संगीत दिग्दर्शन ए. आर. रहेमानचं होतं.त्या काळात या जोडीने ‘रोजा’, ‘बॉम्बे’सारखे चित्रपट दिले होते त्यामुळे चित्रपट स्वीकारला.


# चित्रपट क्षेत्रात गॉडफादर,घरनेशाही याबद्दल तुज़े मत ?

हो बाहेरून तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करत असाल तर तुम्हाला नक्कीच प्रचंड कष्ट करण्याची तयारी हवी,घराणेशही मुळे त्या कलाकारांना मोठया बॅनरकडे काम करण्याची संधी लगेचच मिळते,जि कि आज देखिल अनेक गुणवंत कलाकाराना मिळालेली नाही,यावर आपण काही करु शकत नाही,फक्त आपण आपले काम प्रामनिक पणे करत रहावे.

# मराठीत काम करायला एवढा वेळ का घेतला ?

मराठीत अनेक संहिता मझयाकडे यागोदर आल्या पण त्या न आवडल्याने मी नकारल्या,दुसरी गोष्ट म्हणजे मराठीत स्क्रिप्ट चांगली असायची,पण निर्मितीमूल नसायचे.मराठी चित्रपटांचा निर्मिती खर्चही वाढू लागला आहे,मराठी चित्रपटांत काम करावं,अशी माझी स्वत:ची  इच्छा होती.त्यानंतर "मात" या चित्रपटाची कथा ऐकली मला ती आवडली त्यामुळे मराठीत येण्याची यापेक्षा दुसरी चांगली संधी मिळणार नाही असे वाटले आणि हा चित्रपट स्वीकारला.


# ‘मात’ मधील तुझी व्यक्तिरेखा कय आहे ?

या चित्रपटात मी एका मध्यमवर्गीय विवाहित स्त्रीची भूमिका करतेय,जि कि खूप टॅलेंटेड आणि खंबीर आहे,तिच्या आयुष्यात काही घडामोडी घडतात आणि तिच जीवन पूर्णपणे बदलून जातं.त्यानंतर ती आयुष्याला कशी सामोरी जाते,याची कथा या चित्रपटात आहे.हा एक स्त्रीवादी चित्रपट आहे आणि यातली माझी भूमिका माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी आहे.

# मराठी चित्रपटांचे निर्मितीमुल्य कमी असते अशी ओरड होते तसा तुला काही अनुभव आला का ?

मराठी चित्रपतंबद्दल हि ओरड होते,पण हल्लि मराठी मधेहि निर्मिती खर्च वाढलेला आहे.‘मात’ या चित्रपटांच्या निर्मात्यांचाही हा पहिला चित्रपट आहे.पण मला तरी तसा अनुभव आला नाही अमचया निर्मात्या यांनी आर्थिक बाबतीत कोठेही काहीही कमी पडू दिलेले नाही.

# सध्या तुझ्याकडे कुठले चित्रपट आहेत?

नाही, सध्या कुठलेही चित्रपट मि करत नाहीय. मला काही चित्रपटांची ऑफर आली होती,मी माझ्या स्वत:च्या कामासाठी सध्या व्यस्त  आहे.पण नक्कीच सर्व जमून आल तर चित्रपट करेन.

# युवकाना कोणता संदेश देशिल ?

स्वतःवर विश्वास ठेवा,मेहनत करा यश नक्की मिळते.



- श्रीनिवास कुलकर्णी.


.