भ्रष्टाचार आणि घोटाळे
काही दिवसांमध्ये विविध माध्यमातून भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस येत आहेत. या घोटाळ्यांमुळे राजकारणांवरून, संसदीय कार्यप्रणालीवरून, लोकशाहीवरून आम जनतेचा विश्वास उडतोय. या भ्रष्टाचार रुपी राक्षसास मिटविण्यास चाललेल्या या जन आन्दोलनास सर्व भारतीयानी श्री आण्णा हजारे सारख्या जेष्ट समाज सेवकास पाठीम्बा देऊन हे आंदोलन मोठे केले या आंदोलनामागील यशाचे आणखी एक कारण म्हणजे हे आंदोलन बरोबर वल्ड कप आणि आय पी एल दरम्यान करण्यात आले यामुळे प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष याकडे अधिक राहिले.आण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक मंजुरीसाठी जो उपोषणाचा मार्ग स्विकारला तो अहिंसावादी व सर्वमान्य आहे. आंदोलनामुळे समाज किती सजग आहे याचा प्रत्यय आला .यानिमित्ताने प्रत्येकाच्या मनातील चीड दिसत आहे.नुकतेच लोकपाल विधेयकाची मंजुरी म्हणून या आंदोलनाकडे पाहण्यापेक्षा भ्रष्टाचाराच्या विरूध्द उठलेल्या आवाजास पाठिंबा देणे महत्वाचे आहे. बर्याच ठिकाणी मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यात आले ते जनशक्ती दाखवण्यासाठी या पाठिंब्यामुळे सरकारवर एक प्रकारचा दबाव निर्माण होईल, जेणे करून परिस्थितीत काही तरी सुधारणा होऊ शकेल. असे असताना आपण वैयक्तिक पातळीवर काय करतो छोटी मोठी कामे असतील , ट्राफिक पोलिसांनी पकडलं येथे लाच देण्याचा प्रयत्न करतो मग आपण हि तेवडेच दोषी आहोत. याची सुरवात आपण स्वतः केली पाहिजे "मी लाच देणार नाही व मी लाच घेणार नाही" अशी प्रतिज्ञा सर्वांनी केली पाहिजे असे झाल्यासच हे आंदोलन यशस्वी होईल. सध्या भारत हा वेगाने प्रगती करणारा देश आहे व एकविसाव्या शतकात भारत हा महासत्ता बने असे म्हणले जाते या मार्गात सर्वात मोठा अडथला म्हणजे भ्रष्टाचार.चला तर मग या भ्रष्टाचाराला संपवूया आणि भ्रष्टाचार मुक्त भारत घडवू या........
- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:
Post a Comment