Sunday, August 19, 2012

अश्लील चित्रपटांवर बंधीच घाला . . .

अश्लील चित्रपटांवर बंधीच घाला . . . 



अलीकडेच आलेले देहली बेली,प्यार का पंचनामा हे एक अश्लील विनोद असलेले चित्रपट आहेत.आमीर खान चा हा चित्रपट पाहिल्यानंतर आता एखादा नवीन चित्रपट पाहायला सहकुटुंब जायला धास्ती वाटत आहे.खरतर मागे सिगारेट ओढणे याला चित्रपटात बंदी आली होती ती हटली कधी ?. बोस डी के हे  शिव्या युक्त गाणे लहान मुलं गुणगुणताना दिसत आहेत.आमीर खान म्हणाला कि हि वास्तव स्थिती आहे पण चित्रपटात वारंवार हे दाखवला जात असल्यामुळे fashion म्हणून तरुण याकडे आकर्षित होत आहेत आणि मग हि वास्तव बनत आहे.सद्ध्याची युवा पिढी चित्रपटांचे अनुकरण करते.अशी स्थिती कदाचित मोठ्या शहरान मद्धे असेल हि पण आता हे वातावरण खेड्याकडे हि येऊ लागले आहे.सद्ध्या युवा पिढी सक्षम बनवण्यापेक्षा तिला व्यसनी बनवण्य मद्धे अशा चित्रपटांचा मोलाचा वाटा आहे.त्यातच याचा पुढचा भाग लवकरच आमीर काढणार आहे व तो स्वतः त्यात कामही करणार आहे . चित्रपट पाहताना लहान मुलाना देखील याचे तिकीट देण्यात आले कोवळ्या वयात त्यांचावर  काय संस्कार घडतील व त्यांची भाषा कशी असेल ?. त्यामुळे देशा समोर भ्रष्टाचार,दहशतवाद यांसारख्या समस्या आहेत त्यातच भारताची युवा पिढी हि भारताचा कणा मानली जाते आणि ती जर व्यसनी बनली आणि मुखी अश्लील भाषा असेल तर ते देशासाठी अधिकच धोकादायक बनेल.त्यामुळे अशा चित्रपटानवर बंधी आणली पाहिजे.अशा चित्रपटांचे तिकीट लहान मुलांना तिकीट देयू नये तसेच वाहिन्यान वर हे चित्रपट दाखवले जाऊ नयेत.मागे काही वर्षांपूर्वी एक प्रकार घडला होता रामायण या गाजलेल्या मालीकेमद्धे एक कलावंत रामाचा रोल करायचा तो एकदा असाच रस्त्यावर लोकांना सिगारेट ओढताना दिसला लोकांनी त्याला बेदम मारले.स्क्रीन वर एवडे चांगले रोल आणि प्रत्येक्षात असं चरित्र.सांगण्याचा तात्पर्य इतकेच कि लोकांवर अभिनेत्याचा प्रचंड प्रभाव आहे.त्यामुळे युवापिढीवर वाईट संस्कार घडवणाऱ्या अश्या चित्रपटांवर बंधीच घातलीच पाहिजे.

- श्रीनिवास कुलकर्णी. 

No comments:

Post a Comment