गुरुदत्त ते जिया खान . . .
जिया खान हिच्या जाण्याने संपूर्ण चित्रपट श्रुष्टीला धक्का बसला.नैराश्य,अपयश, एकटेपणा यांमुळे जीवन संपवलेली अनेक उदाहरणं आहेत.यामाद्धे गुरुदत्त,मनमोहन देसाई,परवीन बाबी,दिव्या भारती,सिल्क स्मिता,नफिसा जोसेफ,कुलजित रंधावा,कुणाल सिंग,नेहा सावंत,विवेका बाबाजी अशी अनेक नावं घेता येतील.
गुरुदत्त (१९६४)
१ ९ ६ ४ साली दारू आणि झोपेच्या गोळ्या यांचे अतिरिक्त सेवन यामुळे गुरुदत्त यांचे निधन झाले,त्यांचे निधन म्हणजे आत्महत्या की अपघात, यमद्धे अनेक मतांतरं ऐकायला मिळतात.त्यात कागज के फुल या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे न मिळवलेले यश,तसेच गुरुदत्त आणि पत्नी गीता दत्त यांच्यातील वादामुळे वाढत अंतर हे त्यातील महत्वाचं कारण मानलं जातं.
मनमोहन देसाई (१९९४)
'अमर अकबर अॅन्थनी', 'कुली', 'परवरिश' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक मनमोहन देसाई हे १ ९ ९ ४ साली त्यांच्या राहत्या इमारतीतून खाली पडून मृत्यू पावले.चित्रपट न चालल्याने नैराश्यापोटी त्यांनी हे पाऊल उचलले,तर पाठीच्या दुखण्यामुळे त्यांना स्वत:चा तोल सावरता आला नाही, आणि ते इमारतीवरून पडले, अश्या अनेक गोष्टी त्यांच्या मृत्यूबाबत बोलल्या जातात.
दिव्या भारती (१९९३)
अवघ्या वयाच्या १ ९ व्या वर्षी १ ९ ९ ३ मद्धे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून हि अभिनेत्री मृत्यू पावली,'विश्वात्मा', 'दिवाना', 'शोला और शबनम' अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिव्या भारतीने आत्महत्या केली,तिचा तोल गेला,किवा तिला कोणी ढकलले की,हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.
सिल्क स्मिता (१९९६)
दक्षिण भारतीय चित्रपटान मद्धे अनेक वादग्रस्त भूमिका करणारी विजयालक्ष्मी ऊर्फ सिल्क स्मिताने १९९६ मध्ये विष पिऊन आत्महत्या केली.शेवटच्या काळात नैराश्य,प्रेमभंग, अपयश हि त्यामागची प्रमुख कारण जातात.अलीकडेच "डर्टी पिक्चर" हा तिच्या जीवनावर आधारित चित्रपट येउन गेला.
मॉडेल नफिसा जोसेफ (२००४)
वयाच्या २६ व्या वर्षी मॉडेल नफिसा जोसेफने २००४ साली आत्महत्या केली.गौतम खंडूजाशी तीचे प्रेमसंबंध होते,त्यांचा विवाह होता मात्र गौतमने पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्याने नफिसाने आपले जीवन संपविले.
परवीन बाबी (२००५)
अमिताभ बच्चन सारख्या अनेक बड्या कलाकारांसोबत काम करून एक काळ गाजवणारी परवीन बाबी तिच्या शेवटच्या दिवसात एकटी पडली,ती तिच्या राहत्या घरी २ ० ० ५ मद्धे मृत अवस्थेत आढळली. तब्बल तीन दिवसांनी तिच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली,तिने आत्महत्या केली की तिचा मृत्यू नैसर्गिकच होता, हे अद्याप गूढ आहे.
मॉडेल कुलजित रंधावा (२००६)
जीवनातील ताणतणाव सहन करणे कठीण जात असल्या कारणाने जीवन संपवतेय अशी चिठ्ठी लिहून मॉडेल कुलजित रंधावाने २००६ रोजी आत्महत्या केली.
कुणाल सिंग (२००८)
'दिल ही दिल में' या चित्रपटात सोनाली बेंद्रे या अभिनेत्री सोबत काम करून अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेला कुणाल सिंग याने २ ० ० ८ मद्धे गळफास लावून आत्महत्या केली.कुणालच्या वडिलांनि ती आत्महत्या नसून खून आहे असे वक्तव्य केले होते.
नेहा सावंत (२०१०)
नेहा सावंत ही ११ वर्षांची चिमुकली 'बुगी वूगी' या कारेक्रमामद्धे सहभागी झालेली बालकलावंत.अभ्यासामुळे आई-वडिलांनी नृत्य करण्याची परवानगी नाकारली त्यामुळे तिने २०१० मद्धे घरीच गळफास लाऊन आत्महत्या केली.
मॉडेल विवेका बाबाजी (२०१०)
प्रियकर गौतम व्होरासोबत प्रेमसंबंध संपुष्टात आल्यामुळे मॉडेल विवेका बाबाजीने २०१० रोजी निवासस्थानी आत्महत्या केली.
जिया खान (२०१३)
अमिताभ बच्चन,आमिर खान,अक्षय कुमार यांच्या सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करून सुरवातीलाच चर्चेत येणारी अभिनेत्री जिया खान,व्यावसायिक आणि खाजगी जीवनातील अपयश याला कंटाळून तिने जुहु येथील राहत्या निवासस्थानी जीवन संपवले.यात प्रेम संबंधातील अपयश हे त्यातील प्रमुख कारण मानले जाते.मृत्युच्या काही महिने अगोदर देखील तिने अत्महत्तेचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.
हल्ली चित्रपट श्रुष्टी मधील पैसा,प्रसिद्धी अश्या अनेक कारणांमुळे चित्रपट श्रुष्टीत येण्याचा ओघ वाढत चालला आहे.त्यामुळे चित्रपट,मालिका,नाटक यातील कामांसाठी प्रत्येक शेत्रात अनेक प्रमाणात कलावंत उपलब्ध आहेत.त्यामुळे त्यातील स्पर्धा आता भयाण रूप घेताना दिसत आहे. त्यामुळे प्रचंड बेभरवश्याचे मानले जाणारे हे क्षेत्र,यातील स्पर्धा,नैराश्य,ताणताणाव,असुरक्षिततेची भावना यामुळे अनेक वेळा मानसिक ताणताणाव वाढत जाऊन अनेक कलावंत जीवाला मुकतात.
- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:
Post a Comment