शताब्दी वर्षानिमित्त 'प्रभात' तर्फे कलेचा गौरव
भारतीय सिनेसृष्टीचे शतक महोत्सवी वर्ष चालू असून प्रभात फिल्म सारख्या कंपनीने सिनेसृष्टीला बहुमोल असे योगदान दिले आहे.सामाजिक समस्यांना चित्रपटांतून मांडण्याची परंपरा प्रभातने सुरू केली व मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनपर चित्रनिर्मिती केली.लोकांच्या मनावर अद्यापही प्रभात चित्रे अधिराज्य करीत आहेत.सिनेमाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यात पहिल्यांदाच "प्रभात" मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आज मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय पातळीवर झेप घेत आहे त्याचे प्रभातशी एक प्रकारचे ऋणानुबंध आहेत.मराठी चित्रसृष्टी ज्या उत्कर्षाप्रत पोहोचावी असे प्रभातचे स्वप्न होते, त्याच स्वप्नाच्या कृतार्थ आणि कृतज्ञ जाणिवेतून प्रभात परिवाराने या वर्षीपासून मराठी चित्रपटांच्या कलागुणांच्या सन्मानासाठी दरवर्षी प्रभात पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह दिग्दर्शन, लेखन, अभिनय, संगीत, छायांकन, संकलन, अनुषंगिक तंत्रांसाठीचे व काही वेगळे वैयक्तिक पुरस्कारही दिले जाणार आहेत. या सर्व पुरस्कारांना प्रभात चित्रपटांना ज्यांचे योगदान लाभले होते त्या प्रतिभावंतांची नावे असणार आहेत.यंदाच्या या भारतीय चित्रपटांच्या शताब्दीवर्षापासून मराठी चित्रपटांच्या दुस-या सुवर्णयुगाचे हे प्रभातने केलेले स्वागत आहे,यापुढे दरवर्षी स्पर्धेतील निवडक चित्रपटांचा एक साप्ताहिक महोत्सव पुण्यात चित्रपट अभ्यासक, रसिक आणि विविध माध्यम आणि क्षेत्रातील मान्यवरांसाठी आयोजित केला जाणार आहे.
यंदा हा महोत्सव दि. १० मे ते १६ मे या कालावधीत प्रभात चित्रपटगृह, पुणे येथे पार पडला,या. महोत्सवात काकस्पर्श,तुकाराम,भारतीय,संहिता,इन्व्हेस्टमेंट,धग,अनुमती असे सात चित्रपट दाखवण्यात आले.यावेळी चित्रपट दिग्दर्शक,कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी रसिकांशी संवाद साधला.यामद्धे प्रदर्शित न झालेल्या चीत्रपटात स्मशानात काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाची कथा मांडणारा 'धग',तर सहजीवनाचा अर्थ सांगणारा 'अनुमती' आणि आर्थिक समृद्धीकडे झेपावणा-या पात्रांमधील भावनिक आणि मानसिक संघर्षाचे चित्रण असलेल्या 'इन्वेस्टमेंट' ने प्रेक्षकांची व समीक्षकांची वाहवा मिळवली. तर 'संहिता' मधून नात्यांची गुंतागुंत पटकथा लेखिकेच्या नजरेतून उलगडत जातानाचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
प्रभात पुरस्काराचे आयोजक विवेक दामले म्हणाले की, "प्रभातच्या लौकिकाला साजेश्याच निष्ठेनं व पध्दतीनं हे पुरस्कार दिले जावेत ही जबाबदारी मोठी असल्याची जाणीव आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नही तसेच राहणार आहेत. पुरस्कारांची विश्वासार्हता आणि दर्जा राखण्यासाठी चित्रपटांचे मुल्यांकन योग्य व सक्षम परिक्षकांकडे सोपवले असून.पुरस्काराच्या निवडप्रक्रियेत व्यासंगी चित्रपटतज्ञांसह निवडक जाणकार चित्रपटरसिकांनाही सहभागी करुन घेण्यात आले आहे".तर प्रभात ने पुन्हा चित्रपट निर्मिती करावी अशी इच्छा यावेळी महेश मांजरेकर यानि बोलताना व्यक्त केली.
महोत्सवात मार्गदर्शनासाठी मा. सुमनताई किर्लोस्कर, मा. प्रतापराव पवार, मा. श्रीनिवासराव पाटील आणि मा. डॉ.जब्बार पटेल यांच्यासारख्या दिग्गजांचे सहकार्य लाभले,तर विवेक दामले,मंगेश नगरे आणि राज काझी यांनि महोत्सवाचे संयोजन केले. प्रभात पुरस्कारप्रदान समारंभ प्रभातच्या वर्धापनदिनी म्हणजेच १ जून रोजी पुणे येथे शानदार सोहळयात रंगतदार सांस्कृतिक रजनीमध्ये जल्लोषात पार पडेल.
- श्रीनिवास कुलकर्णी
No comments:
Post a Comment