Sunday, August 19, 2012

नैसर्गिक उर्जेचा वापर काळाची गरज . . .

नैसर्गिक उर्जेचा वापर काळाची गरज . . .


नुकतच काही कामा निमित्त एका खेडेगावात जाण्याचा योग आला.तेथे काही गावकरी बांधव आणि काही मित्रांशी ओळख झाली.त्यांच्याशी चर्चा करताना त्यांची घरे न्याहाळताना एक गोष्ट निदर्शनास आली कि हि गावं आता विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनत चालल्याचे चित्र दिसले.यासाठी ग्राम पंचायतींचे कौतुक करायला हवे.काही गावातील ग्राम पंचायतींनी त्या उपकरणांचा ९० % खर्चाचा भार स्वतः उचलला आहे,३००० रु. असणारे उपकरण केवळ ३०० रु. मद्धे उपलब्ध करू देण्यात आले आहे.त्यामुळे अनेक गावे आज विजेच्या बाबतीत स्वावलंबी झालेली दिसत आहेत.
सौर उपकरण (सौर प्लेट) ही सिलिकॉन पासून बनलेली असते,त्यामुळे हे उपकरणा अतिशय महाग असल्यामुळे अनेक लोक ते घेण्याचे टाळतात.सौर उर्जा या भारतातील काहीश्या दुर्लक्षित नैसर्गिक उर्जा स्त्रोताचा अतिशय सुरेख वापर ग्रामीण भागात होत आहे.भारतात पंजाब आणि राजस्थान या राज्ज्यान मद्धे मोठ्या प्रमाणात सौर उर्जा वापर होतो.यामद्धे काही दिवसात गुजरात च्या नावाचा देखील समावेश काही दिवसात होयील.
वाढत्या लोकसंखेमुळे जागेचा प्रश्न किवा कमी होत असलेल्या शेतीचा प्रश्न असला तरी उर्जा संवर्धन करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या वाळवंटांचा, माळरानांचा उपयोग केला जाऊ शकतो.
मध्यंतरी या विषयातील अभायासक भिडे सर यांचा लेख वाचण्यास मिळाला त्यांच्या अभ्यासा अनुसार "महाराष्ट्राचे केवळ १० टक्के क्षेत्र वापरले आणि या ऊजेर्चे रूपांतर विजेमध्ये केवळ तीन टक्के क्षमतेने केले तरीही दोन लक्ष मेगावॉट वीज निर्माण होऊ शकते. ही वीज राज्याच्या सध्याच्या गरजेच्या १० पट आहे."
मागे शहरामद्धे अनेक ठिकाणी पथदिवे तसेच वाहतुकीचे दिवे सौर उर्जेवर करण्यात येतील असे जाहीर करण्यात आले पण अजूनहि त्या योजनांची अंमल बजावणी होताना दिसत नाहीये.आता जास्तीत जास्त खर्चाचा भार सरकारने उचलून शहरी भागात देखील सौर उपकरणे अल्प दारात उपलब्ध करून द्यावीत.ज्यामुळे अत्यल्प दारात वीज निर्मिती होऊन विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होयील.एकंदरीत सौरऊर्जा तंत्रज्ञान अधिक अधिक विकसित करून विजेच्या बाबतीत स्वावलंबी होणे त्याकडे गांभीर्याने पहाणे अतिशय गरजेचे आहे.

- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment