कंटाळवाणा,बाळबोध तात्या विंचू लगे रहो . . .
केवळ मनोरंजन हे उधिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला अमोल मुके दिग्दर्शित ' तात्या विंचू लगे रहो ' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला आहे.हा चित्रपट वेगवेगळ्या कारणाने प्रदर्शना अगोदर पासून चर्चेत आहे.या चित्रपटात एके काळी सर्वांच्या मानामद्धे दहशत निर्माण करणारा तात्या विंचू यावेळी सकारात्मक भूमिकेत दिसून येतो.विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता संजय नार्वेकर रवि,विक्रांत,आणि तात्या विंचू (पात्र त्याच्या अंगात शिरल्यावर) अश्या तिहेरी भूमिकेत दिसून येतो.चित्रपटाची कथा रवि
(संजय नार्वेकर) या बेकार तरूणा भोवती फिरते.एके दिवशी रवीची भेट अपघाताने "तात्या विंचू" या (अॅनिमेडेट) पात्राशी घडते.त्यानंतर तात्या विंचू रविच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यानंतर त्याचा गुंडान बरोबर Saamna रंजक घटना घडत जातात आणि तात्या विंचू आपल्या शक्तीने या सर्व घटनांना सामोरे जातो.इकडे विक्रांत ज्याला रवि याच्या मूळे तुरुंगात जावे लागते.तात्या विंचूच्या शक्तीचा गैरवापर करून शहरात धुमाकूळ माजवण्यासाठी आणि रवीचा बदला घेण्यासाठी.तो रविची प्रेयसी प्रतीक्षा (शीतल पाठक) हिला पळउन नेत.आणि शेवटी रवि या सर्वां मधून प्रतीक्षा ची सोडवणूक करतो.
दिग्दर्शनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर अनेक ठिकाणी प्रसंग अधिक खुलवता आले असते.काही प्रसंग पाहताना ते केवळ चित्रपटाची लांबी वाढवण्यासाठी टाकले असावेत असे वाटत राहते.काही प्रसंगात कथेला सामाजिक धागा जोडण्याचा केलेला प्रयत्न बर्याच अंशी फसलेला आहे.बर्याच ठिकाणी कथा भरकटल्या सारखी वाटते.अॅनिमेडेट पात्र म्हणून रसिकान मद्धे उत्सुकता असलेले "तात्या विंचू" हे पात्र खूप कमी वेळ चित्रपटात दिसते.पुन्हा ते पात्र संजय नार्वेकर अभिनयातून प्रेक्षकांना दाखवत राहतो.त्यामुळे अॅनिमेशन खूप कमी पाहायला मिळते. एक्शन दिग्दर्शक हरीश शेट्टी यांनी चांगले काम केले आहे.यातील काही अॅक्शन प्रसंग पाहतानादाक्षिणात्य सिनेमाच्या शैलीची आठवण होते.संजय नार्वेकर याने उत्तम भूमिका साकारली असून त्या जोडीलाच शीतल पाठक,प्रतीक्षा जाधव,किशोरे नांदलस्कर यांच्या भूमिकाहि चांगल्या झाल्या आहेत.यामाद्धे अनेक नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे बर्याच ठिकाणी त्यांचे नवखेपण जाणवते.कथा,संवाद यावर अधिक चांगले काम करता आले असते.चित्रपटाचे संगीत राधा चंद्र यांचे असून काही गीते श्रवणीय झाली आहेत.एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कमी पडतो.
- श्रीनिवास कुलकर्णी

No comments:
Post a Comment