Sunday, August 19, 2012

सोशल मिडिया . . .

सोशल मिडिया

आजकालच्या जगात सोशल नेटवर्किंगनं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.mobile वर सर्वांना संदेश पाठवण्यापेक्षा यावर आपलं  " स्टेटस " अपडेट केलं कि माहिती एकाच वेळी अधिक वेगाने आणि सर्व मित्रान पर्यंत पोहचते.असो पण सद्ध्यातरी फेसबुकचं नाव आघाडीवर आहे.काही वर्षांपूर्वी चार नौजवान पोरांनी लाँच केलेली ही वेबसाइट आज जगभरातल्या आबालवृद्ध नेटिझन्सच्या गळ्यातली ताईत बनली आहे.
या फेसबुकला टक्कर देण्यासाठी ‘गूगल प्लस’ social networking  च्या जगात नुकतच दाखल झालं.अजून अनेक लोकांना ‘गूगल प्लस’ बद्दल माहित नसल्या मुळे याबद्दल सद्ध्या तरी हा अंदाज व्यक्त करणे चुकीचे ठरेल.पण याला उत्तर देण्यासाठी "फेसबुक" ने हि चांगलीच कंबर कसली आहे.फेसबुकहि नवनवीन applications आणत आहे.फेसबुकची नक्कल करतानाच त्याच्या मर्यादा आणि दुर्गुणांना बाजूला सारून गूगलने निर्माण केलेल्या गूगल प्लस कितपत तग धरतो हे पाहणे रंजक ठरेल.सहज सोपी हाताळणी, आकर्षक मांडणी आणि अमर्याद माहिती या सर्वाचा ताळमेळ साधतानाच गूगल प्लसनं व्यक्ती-व्यक्तींमधल्या ‘प्रायव्हसी’बद्दलच्या फेसबुकच्या सर्वात मोठय़ा अपयशावर मात केली आहे.यातच ‘गूगल प्लस’ ने नेटवर्किंगवर भेटणा-या असंख्य परिचितांचं आपले मित्र, कुटुंबीय, सहकारी किंवा निव्वळ ‘ओळखीचे’ असं वर्गीकरण करून व्यक्तीव्यक्तींमध्ये प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न केला आहे.त्याला तोडीस तोड फासिबूक ने हि आता हि सुविधा चालू केली आहे.आणि skype च्या मदतीने व्हीडिओ चॅटिंगसारखी सुविधा फेसबुकवर सुरु आहेच. एकूणच आता हि स्पर्धा अधिकच रंगणार असं चिन्ह दिसतं आहे.पण ही स्पर्धा आजची नाहीये.मागे गूगल ने गूगल बझ, गूगल वेव्ह, ऑर्कुट आठवतायेत ना?.फेसबुक, ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटशी स्पर्धा करण्यासाटी गूगलनं बनवलेली ही प्रोडक्टस आज बर्याच कमी प्रमाणात वापरात आहेत.एकदम सुरवातीला लाँच करण्यात आलेलं ऑर्कुट हा सोशल नेटवर्किंगच्या इतिहासातला माइलस्टोन ठरला.पण कालांतराने फेसबुक आणि ट्वीटरचा बोलबाला भारतात वाढू लागला नि "ऑर्कुट" गिरी मागे पडत गेली. आजघडीला यूजर्सच्या आकडेवारीनुसार जगभरातील पहिल्या 100 वेबसाइटमध्ये ऑर्कुट 99 व्या क्रमांकावर आहे.फेसबुक/ट्वीटरनं ऑर्कूटवर मात केल्यानंतर गूगलनं या दोन सेवांशी जोरदार स्पर्धा सुरू केली.त्यानंतर ‘बझ’ आणि ‘वेव्ह’ आली पण त्यांना यूजर मिळवणंही कठीण बनलं.त्यानंतर आता फेसबुकला टफ फाइट देऊ शकेल, असं‘गूगल प्लस’ हे नवीन अस्र् गूगलनं आपल्या ताफ्यात दाखल केल आहे .त्यामुळे आता हि स्पर्धा उत्तरोत्तर वाढतच जाणार त्यामुळे आता या स्पर्धेत कोण बाजी मारणार कि आणखी नवीन काही येणार हे येत्या काळात पाहणं रंजक ठरेल.

 - श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment