मन चिंब पावसाळी . . .
ऑफिसातल काम संपउन तो घरी आला चार घास घश्याखाली उतरवले आणि निवांत जाऊन अंथरुणावर पडला,दुसर्या दिवशी रविवार असल्याने दिवसभर आराम होयील हि जाणीव त्याला सुखावत होती,याच विचाराने केव्हा डोळा लागला त्याच त्यालाच कळल नाही . . . आणि पाहटे जग आली ती टप टप बरसणाऱ्या सरींच्या आवाजाने . . . कूस बदलून झोपण्याचा बर्याचदा प्रयत्न केला पण झोप काही लागत नव्हती . . . शेवटी ग्यालरित खुर्चीवर बसून तो पाउस अनुभवू लागला . . . टप टप आवाज करत कोसळणाऱ्या पाऊसधारा म्हणजे . . . निसर्गदत्त संगीताची मैफिलच जणू . . . आणि ती ऐकण्यासाठी दूर वरून गर्दी करणारे ढग . . . प्रतिसादाची साक्ष देणारा ढगांचा कडकडाट आणि विजेच्या अवतरन्याने हे सर्व कोणीतरी टिपत असल्याचा होणारा भास . . . पावसाच्या धाराचा आवाज . . . कधी कोमल . . . कधी दीर्घ . . . कधी व्याकूळ तर कधी अल्लड . . . झाडांची सळसळणारी पाने . . . त्यावर साचलेले पावसाचे थेंब . . . आडोश्याला बसलेली प्राणी,पक्षी . . . . हे सर्व चित्र अनुभवताना असताना अचानक अंगात एक शिरशिरी मनात उमटून गेली . . . आणि पावसाचा आनंद आपण कोठेतरी हरवतो आहोत याची मनाला हूर हूर वाटू लागली . . . वाटल मनसोक्त आनंद घ्यावा या मैफिलीचा . . . बस्स ! ठरलं तर . . . त्याने अंगावर कपडे चढवले,दाराला कुलूप लावलं . . . गाडी सुरु केली आणि अंग चोरत पावसाचे थेंब अंगावर झेलत तो निघाला . . . काही वेळातच गाडीने गावाबाहेरचा रस्ता पकडला आणि हिरवळीतून त्याचा प्रवास सुरू झाला . . . तसा त्याला पाऊस प्रचंड आवडतो पण खिडकीतून . . . खिडकी बाहेरच्या पावसाची मज्जा किती वेगळी असते हे बाहेर पडल्याशिवाय कसे कळणार ? ? ?
त्याची गाडी डोंगर दर्यांमधून वळण घेत असताना डोंगरावरून कोसळणाऱ्या समोरच्या धबधब्याकडे त्याचे लक्ष गेले . . . अहाहा ! काय ते सौंदर्य . . . उंचावरून कोसळणारे पाणी . . . पाण्यावर उमटणारे तरंग . . . त्यामुळे वर येणारे धुक्यांचे लोट . . . वा ! काय ते निसर्ग सौंदर्य . . . स्वर्ग यापेक्षा का वेगळा आहे ? ? ? . . . दोन्ही डोळ्यांच्या पापण्या मिटून,पावसाचे थेंब चेहऱ्यावर झेलत त्याने आपले हात आकाशाचाया दिशेने पसरले . . . मिटलेल्या पापण्यांआड जणू काही सारी श्रुष्टी कवेत घेतल्याचा पराकोटीचं आनंद त्याला मिळत होता . . . बराच वेळ निसर्गाची हि मैफिल अनुभवत तो तेथेच बसून राहिला . . .
त्यानंतर त्याने गाडी पुन्हा घराच्या दिशेने फिरवली आणि परतीचा प्रवास सुरु केला . . . पण चेहर्यावर सुख होतं पावसात भिजल्याचं . . . गाडी घरापाशी येऊन थांबली . . . तो गाडीवरून उतरला . . . समोर साचलेल्या पावसाच्या डबक्यात लहान मुले आनंदात उड्या मारत होती,होड्या करून त्या पाण्यात सोडत होती.आज पहिल्यांदा त्याला पावसाचा राग आला नव्हता,चिडचिड झाली नव्हती . . . उलट तिच्या चेहर्यावर समाधान होतं. कारण आज त्याने पावसासारख्या सुंदर गोष्टीला आपलंसं केलं होतं...
- श्रीनिवास कुलकर्णी.
No comments:
Post a Comment