Friday, March 14, 2014

भावना दुखावून धेणे : एक व्यवसाय . . .



भावना दुखावून धेणे : एक व्यवसाय  . . . 

हल्ली भावना दुखावणे हा एक प्रकार आपल्या भारतीय समाजात रुढ होत चालला आहे,रोज वर्तमानपत्र उघडलं कि कोणाच्यातरी भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे अमुक गोष्टीवर बंदी वैगेरे. गोष्टी हमखास वाचावयास मिळतात,भारतीय समाजातील व्यक्तींच्या भावना वरचेवर अधिक अधिक नाजूक आणि हळव्या होत चालल्या आहेत,परवाच दिल्लीतील एका संस्थेच्या सदस्यांचा गणवेश "गुलाबी" होता आणि "गुलाबी ग्यांग" या चित्रपटाच्या नावामुळे त्या संस्थेच्या सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या,वृत्तपत्रांनी त्याला अमाप प्रसिद्धी दिली पण चित्रपट मात्र ठराविक वेळी प्रसिद्ध झाला,त्यामुळे हा केवळ प्रसिद्धीसाठी अवलंबलेला मार्ग होता कि आणखी काही हा विचार सोडला तरी ती संस्था आणि चित्रपट या दोघांना हि प्रचंड प्रसिद्धी मिळाली,त्यामुळे काही अपवाद सोडले तर भावना दुखावणे या नावाखाली एक प्रकारचा व्यवसाय समाजात रूढ होऊ पाहतो आहे.  

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावना दुखावून घायला हव्यात.एखाद्या समाजावर वादग्रस्त वक्तव्य करणे,अश्लील वक्तव्य करणे,हिंदू देवतांचा अपमान करणं अश्या गोष्टी 'जाणीवपूर्वक' करायच्या आणि अमाप प्रसिद्धी मिळवायची,पूनम पांडे,राखी सावंत तसेच दारू पिउन तुरंगाची हवा खाणारा एका राजकीय पुढार्याचा मुलगा आज विनोदाच्या कारेक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो हि आणि अशी इतर बरीच उदाहरणे देत येतील ज्यांनी झोतात येण्यासाठी लोकांच्या भावनांचा वापर केला. 

परवाच एका उपहारगृहात मित्राची वाट पाहत बसलो असताना बाजूच्या टेबल वर सुरु असलेला व्यक्तींमधला संवाद ऐकून डोकं चक्रावल,एक चित्रपट निर्माता समोर बसलेल्या एका समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करीत होता,चर्चेचा सारांश असा कि "त्यातील एक व्यक्ती (चित्रपट निर्माता) विशिष्ठ एका समाजावर चित्रपट बनवत होता आणि तो पूर्ण होताच प्रदर्शन पूर्वी त्या सामाजिक नेत्याने पत्रकार बंधूंना बोलावून चित्रपटातून भावना दुखावल्याचे सांगून निदर्शनं करावीत,दोन दिवसांनंतर त्या समाजातील प्रमुख लोकांना चित्रपट दाखवून त्यात आक्षेपार्ह नसल्याचे सांगून चित्रपट प्रदर्शनाला परवानगी देण्यात यावी,दरम्यानच्या दोन दिवसात तुमची संस्था आणि आमचा चित्रपट दोघेही चर्चेत येऊ ? ? ? ". 

यावरून भावना दुखावल्याच्या नावाखाली ज्या झुंडशाहीचे प्रदर्शन होतांना दिसते त्याला नियंत्रणात आणण्याची नितांत गरज आहे,अन्यथा मुळातच भावनाशुन्य होत चाललेल्या भारतीय समाजाचा भावनांवरचा विश्वासच उडेल.अनेकवेळा हे जाणीवपूर्वक केल जात नसलं तरीदेखील एखादा कर्तुत्वान व्यक्ती अश्या कृत्या मुळे काही काळ का होयीना हवालदिल होतो.व्यक्तीला व्यक्त होण्याचा अधिकार घटनेनेच दिला असला तरी इतरांना दुखावण्याचा,अपप्रचार, अश्लीलता तसेच कोणतेही समाजविघातक कृत्य करण्याचा अधिकार दिलेला नाही आणि याला विरोध करायचाच असेल तर न्यायालयात जाऊन शांततापूर्वक पद्धतीने,इतरांना विश्वासात घेऊन देखील करतो येतो,असे असतांनाही अनेक जण रस्त्यावर उतरतात,जाळपोळ,दगडफ़ेक करतात,या सर्वांवर आवर घालू शकणारे सरकार बहुदा मतपेटीवर डोळा ठेऊन गप्प बसते,त्यामुळे अश्या परीस्थित सामान्य माणसाचे मात्र हाल होतात.त्यामुळे असे प्रकार घडताना त्याला कितपत महत्व द्यायचे ते प्रसिद्धी माध्यमांनी देखील ठरवायला हवे.


- श्रीनिवास कुलकर्णी.

No comments:

Post a Comment