Friday, March 14, 2014

मुलाखत - मुकेश खन्ना.


मुलाखत अभिनेते - मुकेश खन्ना. 



मुकेशजी "शक्तिमान" ची निर्मिती कशी झाली ?  

- मुळात शक्तिमान अगोदर मी महाभारत या मालिकेमद्धे भीष्म पितामह यांची भूमिका वठवली होती,त्यानंतर मला मोठी दाडी वैगेरे असणार्या भूमिका मिळू लागल्या,त्यामुळे मी त्या भूमिकेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होतो.आणि मी पाहायचो कि आपल्याकडील लहान लहान मुले स्पायडर म्यान,ब्याट म्यान अश्या विदेशात तय्यार होणार्या मालिका पहायचे,त्यामुळे भारताचा सुपरहिरो असावा या विचाराने शक्तिमान ची निर्मिती केली. 

"शक्तिमान" चे अनुकरण अनेक लहान मुले करायची,अजूनही करतात यमुळे काही दुर्घटना देखील मागे घडल्या त्याबद्दल . . .  ?

- हो मुळात लहान मुले हि एखाद्या गोष्टीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात,अगदी मी कोठे कारेक्रमाला गेलो असता मला "शक्तिमान सारखे उडून दाखवा गोल गोल गिरकी घेऊन दाखवा" वैगेरे विनंती मला लहान मुलां कडून यायच्या,पण त्यावेळी हे सर्व संगणकाच्या साह्याने केलेल्या करामती आहेत असे समजावून सांगताना मला प्रचंड कसरत करावी लागे,त्यामुळे "छोटी छोटी मगर मोटी बाते" याचा समावेश शक्तिमान या मालिकेमद्धे केला,यातून त्यांच्या मद्धे समाजाप्रती जागरूकता निर्माण ह्वावी हा उद्देश होता. 

सामान्य माणसांनी "शक्तिमान" बनण्यासाठी काय करावे असे आपल्याला वाटते ?

- प्रत्येक जण "शक्तिमान" बनू शकतो,निसर्गतः जी बुद्धी आपल्याला मिळाली आहे त्याचा आपण १० % वापर देखील करत नाही,अगदी ९९.९ % लोक आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत,त्यांनी बुद्धीचा वापर करायला शिकले पाहिजे,शक्तिमान मद्धे शरीरातील चक्र जागवण्याची एक क्रिया दाखवली जायची व्यक्तीच्या शरीरात एकूण सात चक्र असतात.सहस्त्रार चक्र,आज्ञा चक्र,विशुध्द चक्र,अनाहत चक्र,मणिपुर चक्र,स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र हे योग अभ्यासाद्वारे आपण कार्यान्वित करू शकतो,याचा प्रचंड फायदा आपल्याला जीवनात होतो,सोबतच माणुसकी आणि एकमेकांप्रती सहकार्यभाव आपण जपला पाहिजे.    

मुकेशजी आपण आपल्या अभिनय कारकिर्दीत नकारात्मक भूमिका केली नाही ?

- हो,कारण मला नेहमी सत्याची बाजूने लढायला आवडते,आणि हेच कारण असेल कि मी नकारात्मक भूमिकेचा विचार देखील कधी केला नाही. 

मुकेशजी हल्लीच्या मालिकांन बद्दल काय वाटते ?

-  प्रामाणिकपणा,विश्वास,सहकार्याची भावना या गोष्टी समाजातून नष्ट होत चालल्या आहेत,चित्रपट आणि मालिका याचा प्रचंड प्रभाव समाजावर पडतो,अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जातात,यामद्धे सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.

देशातील पहिला सुपरहिरो "शक्तिमान" याबद्दल काही आगामी योजना आहेत का ?

- हा हा हा,मी जायील तिथे मला हा प्रश्न विचारला जातो,या मालिकेबद्दल आजही असणारे लोकांचे प्रेम पाहून आनंद होतो आणि होय तुम्ही म्हणल्याप्रमाणे देशाचा पहिला सुपरहिरो "क्रिश" अथवा "रावण" नसून तो "शक्तिमान" आहे,शक्तिमान हि मालिका पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यावर काम सुरु आहे,आणि त्यावर चित्रपट बनवा अश्या देखील कल्पना समोर आल्या पण हल्ली त्या विचाराधीन आहेत.

अभिनेते मुकेश खन्ना हल्ली कमी पाहायला मिळतात,त्याचे कारण ?

- तसे काही नाही पण हो मी सद्ध्या लहान मुलांना मार्गदर्शक ठरेल,त्यांना सामाजिक बांधिलकीची जाण होयील या अनुषंगाने एक पुस्तक लिहित आहे,लवकरच त्याचे काम पूर्ण होयील.

युवकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता ?

- (मिश्कील्तेने भीष्म पितामह यांच्या आवाजात) आयुषमान भव,सदा विजयी भाव . . . 



मुकेशजी आपल्या पुढील उपक्रमास शुभेछ्या !
धन्यवाद !

- श्रीनिवास कुलकर्णी 

No comments:

Post a Comment