विचार आणि वेडावलेल मन . . .
हल्ली मनामद्धे सतत विचारांच काहूर माजलेल असत,वाटत रहात की नेहमीच्या रगाड्या पासून दूर कुठेतरी जाउन स्वत:शी संवाद साधावा . . . ? त्यामुळे एखाद्या विषयावर व्यापकपणे विचार करणे शक्य होत नाही.अर्थात यास जबाबदार मी स्वतःच . . . ,रोजची धावपळ,सवंगडी,नातेसंबंध त्यांच्या अपेक्षा,स्वप्न आणि त्यांचा पाठलाग यातून वेळ मिळालाच कि मग अवेळी वाजणारा मोबाईल . . . ? ,आणि या सर्व गदारोळात एखाद्या विषयावर चिंतन करण,लिहिण अशक्य होऊन जाते.विचारांच आपल बर आहे केंव्हाही कुठेही त्यांचं येणं जाण सुरूच असतं.त्यामुळे मन म्हणजे विचारांसाची धर्मशाळा अस म्हणल तर वावग ठरणार नाही.त्यामुळ हल्ली या विचारांचाच विचार मनाला सतत साद घालत असतो.अनेक वेळा विचारांमुळे अनावषक भीती मानामद्धे ठाण मांडून राहते,खरं तर भीती हि संवेदनाक्षम मनाची खुण आहे असं मला नेहमी वाटत, असो . . . विचार . . . कधी धो धो कोसळणाऱ्या सरीनसारखे येतात,तर कधी एखाद्या वाटसरूप्रमाणे काही काळ मानामद्धे विसावतात,तर कधी श्रावणातल्या काळ्याभोर मेघांप्रमाणे मनावर विखुरतात.काही अंतर्मुख व्हायला भाग पाडतात,तर काही मन वेडपिस करून टाकतात.रोजच्या संसाराच्या रहाटातून काही काळ दूर येउन नेहमी मनाशी नेहमीच पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या विचारां सोबत काही वेळ घालवावा . . . ,कोण जाणे अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं या निरव शांततेत तर दडली नाहीत ना . . . ?
- श्रीनिवास कुलकर्णी.
No comments:
Post a Comment