मुलाखत - अभिनेता पुष्कर जोग
# आवडतं ठिकाण ?
- स्वीझेर्लंड
# आवडता पदार्थ ?
- बटर चिकन,वरण भात.
# पुष्कर तुझ्या अभिनय प्रवासाची सुरवात कशी झाली ?
- मी child artist म्हणून माझ्या अभिनय प्रवासाला सुरवात केली "राजू" हा माझा पहिला चित्रपट,त्यानंतर वाजवू का,रावसाहेब,साखरपुडा,सून लाडकी सासरची अश्या चित्रपटात भूमिका केल्या,मग अभिनयात काही काळ विश्रांती घेऊन डॉक्टरेट पूर्ण केल,आणि मग जबरदस्त या महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपटातून नायक म्हणून मराठी चित्रपटात काम करायला सुरवात केली.
# तू तुझ्या पहिल्याच चित्रपटात (जबरदस्त मध्ये) सुपर हिरो म्हणून झळकलास तो अनुभव तुझ्या साठी कसा होता ?
- हो खरतर सुपर हिरो साकारताना खूप मज्जा आली आणि बरच शिकायलाही मिळालं,ह्रितिक रोशन हा माझा आवडता हिरो त्याच दिसणं,त्याची शरीर यष्टी,नृत्य या सर्वाचा मी फार मोठा चाहता आहे.कोई मिल गया,क्रिश,धूम ३ हे चित्रपट पाहून मलाही असच करण्याची इछ्या होती,आणि जबरदस्त या चित्रपटामुळे ती पूर्ण देखील करता आली,दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मला वेळोवेळी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळे सुपरहिरो साकारताना मला बराच फायदा झाला,ज्यावेळी तुम्हाला एखादे साहसी दृश्य साकारायचे असते त्यावेळी तुमची शरीर यष्टी लवचिक असणे खूप महत्वाचे असते आणि नृत्य साधनेमुळे माझी शरीर यष्टी या सर्वाला अनुकूल होती,त्यामुळे त्या चित्रपटातील सर्व साहसी दृश्य मी स्वतः कोणताही डमी न वापरता केले आहेत.
# मराठी चित्रपटात नर्तक-अभिनेता हा प्रकार फार कमी पाहायला मिळतो त्याबद्दल तुला काय वाटते ?
- हो हि स्थिती वाईट आहे,जेव्हा तुम्ही अभिनेता म्हणून जेव्हा समोर येत असता त्यावेळी तुम्ही एक उत्कृष्ठ नर्तक असायलाच हवं,आपण मराठी सिनेमाकडे पहिले तर असे अभिनेते जवळ जवळ नसल्यात जमा आहेत,त्यामुळेच मराठी सिनेमातील अभिनेत्यांना glamour कमी मिळते.
# पुष्कर तुझा हिंदी चित्रपट "इट्स टू मच" नुकताच प्रदर्शित झाला त्या चित्रपटाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील ?
- मी धर्मा आणि यशराज फिल्मस चा खूप मोठा चाहता आहे,त्यांचे प्रेमावर बेतलेले सिनेमे,त्यातली सुंदर सुंदर ठिकाणं हे मला नेहमीच आवडतात आणि तरुणांना भावेल,मनोरंजन होयील असा चित्रपट मला करायचा होता आणि तो मी केला "इट्स टू मच" या चित्रपटात हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल,आणि विशेष म्हणजे अभिनयासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील मी स्वतः केले आहे.
# तुझे आगामी चित्रपट कोणते ?
- Don’t Worry Be Happy’(हिंदी) या सिनेमात मी राजपाल यादव,विनय पाठक सोबत दिसेन,त्यानंतर Good Buddy Gadbadi (हिंदी),सासूचे स्वयंवर आणि शिखर या मराठी चित्रपटात देखील मी मुख्य भूमिकेत आहे.
# विधार्थी कट्टा मार्फत युवकांना तू काय संदेश देऊ इच्छितोस ?
- युवकांना मी सांगेन पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे न धावता आपले ध्येय प्रथम निश्चित करा,मेहनत करा त्या ध्येयाचा पाठलाग करा.बर्याच वेळा मेहनत करून देखील अपयश येते पण खचून न जाता आपल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल,प्रयत्न करत राहा,यश नक्की मिळेल.
विधार्थी कट्टा या साप्ताहिकाला मुलाखत दिल्या बद्दल धन्यवाद आणि अगामी चित्रपटांसाठी शुभेछ्या !
- श्रीनिवास कुलकर्णी.
No comments:
Post a Comment